नागपूर :अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून आरोपींनी घरी सोडून देण्याऐवजी निर्मनुष्य स्थळी नेले. तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. अखिल उर्फ अक्की महादेव भोंगे आणि पवन विठ्ठल भासकवरे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन महिन्यांपूर्वी पीडितेच्या मैत्रिणीने आरोपींसोबत ओळख करून दिली होती. येता जाता भेट होत असल्याने पीडितेची आरोपींसोबत मैत्री झाली होती. मंगळवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पीडित तरुणी पायी चालत घरी जात असताना, आरोपी अखिल महादेव भोंगे आणि पवन भासकवरे हे दोघेही कार घेऊन आले. तुझ्या घराच्या दिशेनेच जात असल्याची बतावणी करून दोघांनी तिला कारमध्ये बसवले.
गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक : पीडित अल्पवयीन मुलीला सोडून आरोपींनी पळ काढला. पीडितेने कसेबसे घर गाठले. घर गाठताच तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तत्काळ गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरुद्ध भादंवि ३६३, ३७६ (२) (जे), ३७६ (५), ३२३, ५०६, ३४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.