महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात भाजपचे चारही आमदार जिल्हाधिकारी कार्यालयात धरण्यावर

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. नागपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सध्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे.

Nagpur BJP MLA news
नागपूर भाजप आमदार ठिय्या आंदोलन

By

Published : Apr 19, 2021, 12:54 PM IST

नागपूर - उपराजधानी नागपुरात मागील दोन दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा एकही व्हॉयल सरकार करून पुरवण्यात आलेला नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत खासदार विकास माहात्म्ये, विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दटके आणि आमदार गिरीश व्यास, विधानसभेचे आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेतला.

नागपुरात भाजपच्या चारही आमदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे

मागण्या मान्य करा अन्यथा -

नागपूरसाठी तात्काळ औषधसाठा, ऑक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्या. याबाबत जोपर्यंत आदेश काढणार नाही तोपर्यंत धरण्यावरून उठणार नाही, असा इशारा भाजपच्या या नेत्यांनी दिला आहे.

नागपूरवर अन्याय करू नका -

महाविकास आघाडी सरकार अत्यावश्यक आरोग्य सुविधा पुरवताना नागपूर जिल्ह्यावर अन्याय करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतर जिल्ह्याला द्यायच्या असतील तेवढ्या सुविधा द्या पण, नागपूर जिल्ह्यावर अन्याय करू नका. नागपूर शहरातील वाढत्या मृत्यूंना सरकार कारणीभूत आहे, असा आरोप या आमदारांनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक हेवी वेट नेत्यांनी त्यांच्या भागात औषधांचा साठा नेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details