नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर सभा घेवून आदर्श आचारसंहिता भंग केल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत पोलीस यंत्रणेकडे चौकशी केली असून सभेत नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले आहे.तरीही,सभेच्या व्हीडिओचा अधिक तपास करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ठ केले.
गडकरीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार निराधार - जिल्हाधिकारी
नितीन गडकरींनी सोमवारी संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
२५ मार्चला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाखों समर्थकांच्या उपस्थित निवडणूक अर्ज दाखल केला होता. त्यानंतर नितीन गडकरी आकाशवाणी चौकात एका गाडीवर उभे राहून उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले होते. या संबोधनावर काँग्रेसने आक्षेप नोंदविला आहे.रॅलीदरम्यान, गडकरींनी विनापरवानगी जनतेला संबोधित करुन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार काँग्रेसचे महाराष्ट्र्र प्रवक्ता अतुल लोंढे यांनी निडवणूक अधिकाऱ्याकडे केली होती. या जनसंबोधनात गडकरींनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून येत नसून याबाबत अधिक तपासासाठी सभेची व्हीडिओ पोलिसांना दिल्याचे निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले आहे. गडकरींनी सभेची सर्व परवानगी घेतल्याचे मुद्गल यांनी सांगितले.