महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लखनौ-मुंबई विमान प्रवासादरम्यान 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

लखनौ-मुंबई विमान प्रवासादरम्यान आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आयुषी पुनवासी प्रजापती असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. आयुषीचे कुटुंबीय तिला उपचारासाठी मुंबईला घेऊन जात होते.

By

Published : Jan 20, 2021, 4:47 PM IST

Updated : Jan 20, 2021, 6:11 PM IST

नागपूर विमानतळ
नागपूर विमानतळ

नागपूर - लखनौ-मुंबई विमान प्रवासादरम्यान आठ वर्षीय चिमुकलीला ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याची घटना घडली. त्यामुळे विमानाची नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषीत केले. आयुषी पुनवासी प्रजापती असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. आयुषीचे कुटुंबीय तिला उपचारासाठी मुंबईला घेऊन जात होते.

सर्व प्रक्रिया वैद्यकीय प्रकिया रुग्णालयात पूर्ण करण्यात आली. मात्र, अद्याप आयुषीच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी व्हिसेराचे नमुने तपासले जाणार आहेत. आयुशी पुनवाशी प्रजापती ही चिमुकली उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील भवानीगंज तालुक्याच्या डुंबरीयागंज येथील रहिवासी आहे. आयुषी आजारी असल्याने तिला प्रचंड अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्याचा निर्णय आयुषीच्या वडिलांनी घेतला. मात्र, विमान उंचावर गेल्यानंतर आयुषीला ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्यामुळे तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद -

नागपूर शहरातील सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आयुषीच्या आजारपणासंदर्भात तिच्या कुटुंबीयांनी कोणत्याही प्रकारची माहिती विमान प्रवासादरम्यान संबंधित यंत्रणेला दिली नाही. ज्यावेळी आयुषी विमान प्रवास करत होती. त्याच वेळी ती बेशुद्ध झाली. नागपूर विमानतळावर आल्यानंतर तिला उपस्थित डॉक्टरांच्या पथकाने तपासले असता, तिला मृत घोषित केले.

हेही वाचा -जो बायडेन आणि कमला ह‌ॅरिस यांची प्रतिमा कोरली टरबूजावर

Last Updated : Jan 20, 2021, 6:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details