नागपूर- जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून पिपल फॉर ट्रीटमेंट ऑफ अँनिमल्स, इंडिया (पेटा) च्यावतीने एक अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. संविधान चौकात दोन विद्यार्थ्यांनी अंगावर पृथ्वीचे चित्र रेखाटून पृथ्वीला चामड्यापासून मुक्त करा व पृथ्वीला वाचवा, असा संदेश दिला.
वसुंधरा दिन: चामडी मुक्त व्हा व पृथ्वी वाचवा, पेटाचा नागपुरात अभिनव उपक्रम
पिपल फॉर ट्रीटमेंट ऑफ अँनिमल्स, इंडिया (पेटा) च्यावतीने शहरातील संविधान चौकात हा उपक्रम राबवण्यात आला.
पेटा इंडियाच्यावतीने नागपूरात वंसुधरा दिन साजरा करण्यातआला.
चर्म उत्पादन हे हानिकारक आहे. त्यासाठी मुक्या प्राण्यांना आपले प्राण गमवावे लागते. या उद्योगात चामड्यावर रासायनिक पदार्थ वापरले जातात. यामुळे त्याचा मनुष्याला ही धोका आहे. कातडी सडू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्टिक व विषारी केमिकल्सचा उपयोग केला जातो. ते थेट पाण्यात सोडले जातात व त्यामुळे जलचरांवर देखील प्रभाव पडतो. त्यामुळे संपूर्ण सिथेंटिक लेदर वापरण्याचा संदेश पेटाच्या चमूने यावेळी दिला.