महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकऱ्यांचा तळतळाट लागला म्हणून भाजपच्या हातून सर्व काही गेलं'

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारला ऑटो रिक्षा म्हटले होते. याला धनंजय मुंडे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

धनंजय मुंडें
धनंजय मुंडें

By

Published : Dec 18, 2019, 4:52 PM IST

Updated : Dec 18, 2019, 6:54 PM IST

नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकासआघाडीचे सरकार ऑटो रिक्षा दिसते. पण, आमचे सरकार हे विमान आहे. शेतकरी, बेरोजगार, असुरक्षित लेकी-बाळींसाठी हे सरकार आम्ही स्थापन केले. राज्यातील शेतकऱ्यांचा तळतळाट लागला म्हणूनच भाजपच्या हातून सर्व काही गेले, अशी घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली.

देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना ते अभिभाषणाबद्दल बोलत होते की, सत्तेपासून वंचित राहिल्याचे दुःख बोलून दाखवत होते, हेच कळत नव्हते. फडणवीस म्हणाले बाळासाहेब ठाकरेंप्रती त्यांना आदर आहे. आदर होता तर उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द का नाही पाळला? असेही मुंडे म्हणाले.

भाजपने कधीच दिलेले आश्वासन पाळले नाही आणि आमच्या सरकारला शब्द पाळायला सांगत आहेत. ४४, ५४, ५६ अशा आकडेवारीच्या जोरावरही सरकार स्थापन होऊ शकते, असे आपली लोकशाही सांगते. ही देशातली खरी लोकशाही, भाजप लोकशाहीला दाबायला निघाले होते, अशी टीका मुंडे यांनी भाजपवर केली.

Last Updated : Dec 18, 2019, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details