महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'या' बाप्पाच्या भक्ताच्या नावावर आहे 'लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड'

शंकर नगर भागात रहणाऱ्या ६६ वर्षीय दीपक संत यांना गणपतीच्या प्रतिमा गोळा करण्याचा छंद आहे. बाप्पांच्या निरनिराळ्या पत्रिकांचा संग्रह करून त्यांनी चक्क 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'वर आपले नाव कोरले आहे.

'या' बाप्पाच्या भक्ताच्या नावावर आहे 'लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड'

By

Published : Sep 5, 2019, 11:59 AM IST

Updated : Sep 5, 2019, 1:58 PM IST

नागपूर - शंकर नगर भागात रहणाऱ्या ६६ वर्षीय दीपक संत यांना गणपतीच्या प्रतिमा गोळा करण्याचा छंद आहे. बाप्पांच्या निरनिराळ्या पत्रिकांचा संग्रह करून त्यांनी चक्क 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'वर आपले नाव कोरले आहे.

'या' बाप्पाच्या भक्ताच्या नावावर आहे 'लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड'

गेल्या २५ वर्षांपासून दिपक गणपतीच्या संग्रह करत आहेत. आजरोजी त्यांच्याकडे ४ हजारांच्या वर पत्रिका आहेत. गणपतीच्या पत्रिकांचा हा संग्रह बघता लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांची दखल घेत २००७ मध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला आहे.

भारतच नाही तर जपान,चीन,अफगानिस्तान, इंडोनेशिया, अश्या ४० देशांतील गणपतीच्या प्रतिमा त्यांचाकडे आहेत. देशात इतर कुठेही न सापडणाऱ्या अशा दुर्मिळ १२ राशीच्या गणपतींच्या प्रतिमा देखील त्यांच्याकडे बघायला मिळतात. छंद जोपासणाऱ्या दीपक संत यांच्या संग्रहामुळे नागपुरात त्यांना आता गणेश भक्त म्हणूनच ओळखले जाते.

Last Updated : Sep 5, 2019, 1:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details