नागपूर - उत्तर नागपूरमधून माजी मंत्री नितीन राऊतांच्या उमेदवारीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिव्र विरोध केला आहे. राऊतांना उमेदवारी न देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गटबाजी उफाळून आली आहे.
हे ही वाचा -तुमसर विधानसभा आढावा - पक्षातील मतभेदाचा भाजपला बसू शकतो फटका?
लोकसभा निवडणुकीतदेखील काँग्रेसला गटबाजीचा मोठा फटका बसला होता. विधानसभेत देखील काँग्रेसमधील गटबाजी पहायला मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट दिल्लीत जाऊन नितीन राऊत यांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा यांना हे निवेदन देण्यात आले. २०१४ ला भाजपने उत्तर नागपूरची जागा जिंकली होती. आतादेखील भाजपने विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
हे ही वाचा -अशोक चव्हाणांना विरोधक पकडणार कोंडीत...भोकरमधील भाजपच्या हालचाली वाढल्या