ETV Bharat / state

तुमसर विधानसभा आढावा - पक्षातील मतभेदाचा भाजपला बसू शकतो फटका?

तुमसर विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत राहणार आहे. मात्र, या पक्षातील इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर चित्र वेगळे राहू शकते.

तुमसर विधानसभा
author img

By

Published : Sep 20, 2019, 1:28 PM IST

Updated : Sep 23, 2019, 1:19 PM IST

भंडारा - तुमसर विधानसभेवर मागील पंचवीस वर्षात एकदा सोडली तर वीस वर्षापासून भाजपची एक हाती सत्ता आहे. तर काँग्रेस मागील काही काळापासून सातत्याने मागे जात आहे. तर, राष्ट्रवादी पक्षाचाही पाहिजे तसा प्रभाव या क्षेत्रात पाहायला मिळत नाही. तसेच वंचित बहुजन, आरपीआय, बहुजन समाज पार्टी यांचा विधानसभेत प्रभाव नसल्याने निवडणुकीत मतांचे विभाजन करण्यापलीकडे दुसरी भूमिका या पक्षांची नसते.

तुमसर विधानसभा मतदारसंघ आढावा

हेही वाचा - आष्टी; राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यातच, मुलाच्या उमेदवारीसाठी धस कापणार का आमदार धोंडेंचे तिकीट?

युती झाल्यास तुमसर विधानसभा क्षेत्र भाजपच्या कोट्यात येतो. तर, आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष येथून निवडणूक लढवतो. भाजपतर्फे या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवण्यासाठी बरीच नावे पुढे येत आहेत. तर, काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अनुभवी मोठ्या नेत्याचे नावच नाही. मात्र, याउलट राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवणार्‍या इच्छुकांची मोठी यादी आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या चरण वाघमारे यांनी 73 हजार 952 मते मिळवले होते. तर, भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले मधुकर कुकडे यांनी 45 हजार 273 मते मिळवली होते. भाजपचे चरण वाघमारे हे 28 हजार 679 मतांनी विजयी झाले होते. तिसऱ्या नंबरवर भाजपमधून शिवसेनेत गेलेले राजेंद्र पटले हे होते आणि चौथ्या क्रमांकावर काँग्रेस उमेदवार प्रमुख तीतिर्मारे यांचे डिपॉझीट जप्त झाले होते.

हेही वाचा - अखेर युतीच गणित ठरलं! शिवसेनेला भाजपचा 126 जागांचा प्रस्ताव

2019 साठी या मतदारसंघात 3 लाख 1 हजार 730 एवढे मतदार आहेत. तर, विद्यमान आमदार भाजपचे चरण वाघमारे आहेत. वाघमारे त्यांच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध मेळावे घेऊन लोकांना या योजनांची माहिती दिली आणि त्याचा फायदाही मिळवून दिला. मात्र, असे असले तरी 2019 मध्ये चरण वाघमारे यांची तिकीट कापले जाईल अशी चर्चा आहे. खुद्द आमदारांनीही बरेचदा तसे बोलूनही दाखवले. मात्र, मी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे समोर येताच माजी खासदार शिशुपाल पटले आणि भाजप जिल्हाध्यक्ष तथा तुमसर नगरपालिका अध्यक्ष प्रदीप पडोळे यांनीही आपल्या उमेदवारीची दावेदारी सादर करीत चुरस निर्माण केली. तर, राष्ट्रवादी इच्छुकांची लांब रांग असली तरी राईस मिल असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजू कारेमोरे माजी आमदार अनिल बावनकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या नावाची चर्चा प्रामुख्याने सुरू आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे कॉंग्रेसमध्ये अनुभवी मोठे नाव नसल्याने नुकतीच राजकारणात आलेले पंकज कारेमोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मागच्या निवडणुकीत अनामत रक्क जप्त झालेले प्रमोद तीतीरमारे आणि रमेश पारधी यांचेही नाव इच्छुकांमध्ये आहेत. काँग्रेसमध्ये मोठे नाव नसल्याने जागा बदलून तुमसर विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतर्फे एकमेव सुधाकर कारेमोरे हे इच्छुक आहेत. वंचित, आरपीआय, बहुजन समाज पार्टी या पक्षातील नेत्यांचे नाव सध्या तरी पुढे आलेले नाहीत. 2014 मध्ये भाजपमधून शिवसेनेत जाऊन निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिलेले राजेंद्र पटले सध्या कोणत्याच पक्षात नसल्याने मात्र ते निवडणूक लढवतील अशी अपेक्षा असल्याने नेमका कोणत्या पक्षातून त्यांनी तिकीट मिळेल हे अजून गुलदस्त्यात आहे.

तुमसर विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत राहणार आहे. मात्र, या पक्षातील इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली तर चित्र वेगळे राहू शकते.

सध्या विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्यासाठी सर्वात जास्त अडचणीची गोष्ट ठरत आहे, ती म्हणजे त्यांचे पक्षातील भ्रष्ट लोकांशी असलेले मतभेद. या मतभेदामुळे चरण वाघमारे यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे आणि समजा तिकीट मिळाली तरी निवडणुकीत पक्षातील मतभेदाचा भाजपला फटका बसू शकेल.

Intro:ANC : माझ्या ptc पासून सुरवात

Body:तुमसर विधानसभेवर मागील पंचवीस वर्षात एकदा सोडली तर वीस वर्षापासून भाजपाची एक हाती सत्ता आहे. तर काँग्रेस मागील काही काळापासून सातत्याने मागे जात आहे तर राष्ट्रवादी पक्षाचा ही पाहिजे तसा प्रभाव या क्षेत्रात पाहायला मिळत नाही आणि शिवसेना वंचित बहुजन आरपीआय बहुजन समाज पार्टी यांचा विधानसभेत प्रभाव नसल्याने निवडणुकीत मतांचे विभाजन करण्यापलिकडे दुसरी भूमिका या पक्ष्यांची नसते.
युती झाल्यास तुमसर विधानसभा क्षेत्र भाजपाच्या कोट्यात येतो तर आघाडी मध्ये काँग्रेस पक्ष येथून निवडणूक वाढवितो, भाजपातर्फे या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविण्यासाठी बरेच मोठे नाव पुढे येत आहे तर काँग्रेसकडे उमेदवारीसाठी अनुभवी मोठे नावच नाही मात्र याउलट राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांची मोठी यादी आहे, परभणीत पक्षातील मोठे नाव नसल्याने या विधानसभेतही त्यांचा फारसा प्रभाव पाहायला मिळणार नाही.
2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या चरण वाघमारे यांनी 73 हजार 952 मते मिळविले होते तर भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले मधुकर कुकडे यांनी 45 हजार 273 मते मिळविले होते भाजपाचे चरण वाघमारे हे 28 हजार 679 मतांनी विजयी झाले होते तिसऱ्या नंबरवर भाजपातून शिवसेनेत गेलेले राजेंद्र पटले हे होते आणि चौथ्या नंबरवर काँग्रेस उमेदवार प्रमुख तीतिर्मारे यांची जमानत जप्त झाली होती.
2019 साठी या मतदारसंघात 3,01,730 एवढे मतदार आहेत तर विद्यमान आमदार भाजपाचे चरण वाघमारे आहेत वाघमारे त्यांच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध मेळावे घेऊन लोकांना या योजनांची माहिती दिली आणि त्याचा फायदाही मिळवून दिला मात्र असे असले तरी 2019 मध्ये चरण वाघमारे यांची तिकीट कापले जाईल अशी चर्चा आहे खुद्द आमदारांनी ही बरेचदा तसे बोलूनही दाखविले मात्र मी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे समोर येताच माजी खासदार शिशुपाल पटले आणि भाजपा जिल्हाध्यक्ष तथा तुमसर नगरपालिका अध्यक्ष प्रदीप पडोळे यांनीही आपल्या उमेदवारीची दावेदारी सादर करीत चुरस निर्माण केली. तर राष्ट्रवादी इच्छुकांची लांब रांग असली तरी राईस मिल असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजू कारेमोरे माजी आमदार अनिल बावनकर माजी खासदार मधुकर कुकडे माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या नावाची चर्चा प्रामुख्याने सुरू आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमाणे कॉंग्रेस मध्ये अनुभवी मोठे नाव नसल्याने नुकतीच राजकारणात आलेले पंकज कारेमोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत तसेच मागच्या निवडणुकीत जमानत जप्त झालेले प्रमोद तीतीरमारे आणि रमेश पारधी यांचेही नाव इच्छुकांमध्ये आहेत काँग्रेसमध्ये मोठे नाव नसल्याने जागा बदलून तुमसर विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतर्फे एकमेव सुधाकर कारेमोरे हे इच्छुक आहेत पत्र वंचित आर पी आय बहुजन समाज पार्टी या पक्षातील नेत्यांचे नाव सध्या तरी पुढे आलेले नाहीत. 2014 मध्ये भाजपामधून शिवसेनेत जाऊन निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिलेले राजेंद्र पटले सध्या कोणत्याच पक्षात नसल्याने मात्र ते निवडणूक लढवतील अशी अपेक्षा असल्याने नेमका कोणत्या पक्षातून मिळतात किंवा पक्षी आवडतात हे अजून तरी गुलदस्त्यात आहे.
प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमसर विधानसभा क्षेत्रात मुख्य मुद्दे बाजूला सारून जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली जाते या क्षेत्रात कुणबी समाजाची संख्या सर्वात जास्त आहे त्यानंतर पवार समाज आणि त्याखालोखाल तेली आणि अनुसूचित जातीची संख्या असल्याने कोणत्या जातीचा आशीर्वाद उमेदवाराला मिळतो त्यावर हा निवडणुकीचा निकाल लागतो.
तुमसर विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपा विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ लढत राहणार आहे मात्र या पक्षातील इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली तर चित्र वेगळे राहू शकते.
सध्या विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्यासाठी सर्वात जास्त अडचणीची गोष्ट ठरत आहे ती म्हणजे त्यांचे पक्षातील भ्रष्ट लोकांशी असलेले मतभेद या मतभेदामुळे चरण वाघमारे यांची तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे आणि समजा तिकीट मिळाली तरी निवडणुकीत पक्षातील मतभेदाचा भाजपाला फटका बसू शकेल.
गणेश बर्वे, राजकीय विश्लेषक, तुमसर
या बातमीचे एक काही व्हिडिओ दुसऱ्या फोल्डर मध्ये पाठविले आहे कृपया तेही वापरावे.

Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.