नागपूर- येथील एका औषध व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विनोद चिमणदास रामानी असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. कर्जामुळे त्रस्त होऊन रामाणी यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
कर्जबाजारी औषध व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - nagpur
औषध व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विनोद चिमणदास रामानी असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.कर्जामुळे त्रस्त होऊन रामाणी यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
विनोद रामानी यांचा पूर्व नागपुरात औषधांचा व्यवसाय आहे. शहरातील सतरंजीपुरा आणि वर्धमाननगरा सह इतर भागातही त्यांची सहा-सात दुकाने आहेत. व्यवसाय चांगलाच चालू लागल्याने रामानी हे फिल्म इंडस्ट्री आणि दुसऱ्या व्यवसायातही गुंतवणूक करत असल्याची माहिती आहे. त्यांनी सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जही घेतले होते. या कर्जातुन मिळालेली रक्कम त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये गुंतवली होती. मात्र त्यात त्यांना नुकसान झाल्याने सावकारांकडून घेतलेले कोट्यावधी रुपयांचे कर्जाचे व्याजा वाढत असल्याने आणि मूळ रक्कम देखील फेडण्यास अडचण येत असल्याने विनोद प्रचंड तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तहसील पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.