नागपूर - समोर जाणाऱ्या कंटेनरला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात एसटी ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. तर १० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मौदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सावळी फाट्याजवळ घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव रवींद्र विक्रम जागडे असे आहे.
अपघातानंतर झालेली एसटीची अवस्था नेमकी काय आहे घटना -
सावळी फाट्याजवळ एक वेडसर माणूस येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दगड मारत होता. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर नागपुरहून भंडाऱ्याकडे निघाला होता. त्या कंटेनरच्या पाठीमागे एसटी बस देखील होती. त्या वेडसर माणसाने कंटेनरला दगड मारला. तेव्हा अचानक दगडाचा हल्ला पाहून कंटेनरच्या चालकाने जोरदार ब्रेक दाबला. तेव्हा कंटेनरच्या पाठीमागे असलेल्या एसटी बसची कंटेनरला जोरदार धडक बसली.
धडक बसल्यानंतर चालकाचे बसवरिल नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात चालकाचे पाय बसच्या पुढील भागात अडकले. यात त्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने चालक आणि बसमधील दहा प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, याची माहिती मौदा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी दिली. दरम्यान, या अपघातानंतर या मार्गावरिल वाहतूक खोळंबली होती. तेव्हा पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
हेही वाचा -भाजपचे हृदय दिल्लीत असले तरी दिमाग मात्र नागपुरात आहे - मुख्यमंत्री भुपेश बघेल
हेही वाचा -सरकारी रुग्णालयावर लोकांचा विश्वास नाही, मोहन भागवत यांचे मत