नागपूर -नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या ( Kalmana Police Station ) हद्दीतील चिखली चौक परिसरात असलेल्या हनी-आर्केड इमारतीतील एका व्यापाऱ्यांच्या घरी तब्बल ६१ लाख रुपयांची घरफोडी ( Burglary in Nagpur ) झाल्याची घटना घडली ( Burglary at the house of a vegetable trader ) आहे. पंकज निपाने असे फिर्यादी व्यापाऱ्यांचे नाव आहे. कळमना पोलिसांनी संशयाच्या आधारावर काही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
भाजी व्यावसायिकाच्या घरी 61 लाखांची घरफोडी, संशयित पोलिसांच्या ताब्यात
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या ( Kalmana Police Station ) हद्दीतील चिखली चौक परिसरात असलेल्या हनी-आर्केड इमारतीतील एका व्यापाऱ्यांच्या घरी तब्बल ६१ लाख रुपयांची घरफोडी ( Burglary in Nagpur ) झाल्याची घटना घडली ( Burglary at the house of a vegetable trader ) आहे.
६१ लाखांचा मुद्देमाल लंपास -पंकज निपाने हे नागपुरातील भाजीचे मोठे व्यापारी असून,ते कळमना बाजारात आपला व्यवसाय करतात. पंकज निपाने पहाटे लवकर भाजी व्यवसायाच्या निमित्ताने कळमना भाजी बाजारात गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या फ्लॅटचे दार तोडून घरात प्रवेश केला. घरातील ६० लाखांच्या रोकडसह ६१ लाखांचा मुद्देमाल लंपास ( 61 lakhs worth of goods lost ) केला आहे. पंकज निपाने यांची मोलकरीण घरी आली. तेव्हा घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. तेव्हा घरात चोरी झक्याचं उघड झाल्यानंतर निपाने यांना सूचना देण्यात आली.
रोजच्या व्यापारातील रक्कम लंपास -पंकज निपाने भाजी व्यावसायिक असल्याने त्यांनी व्यवसायाच्या निमित्ताने रोजच्या व्यवहारातील रक्कम घरातील अलमारी मध्ये ठेवली होती. घरी कोणी नसताना चोरट्यांनी फ्लॅटचा मुख्य दार तोडून ती रक्कम चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.