महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाज्योतीला निधी देताना हात थरथरतात का? पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा

राज्यसरकारचे महाज्योतीकडे दुर्लक्ष होत आहे. १० हजार पोलिसांना प्रशिक्षण देऊ असे वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, प्रशिक्षणाची कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे. तसेच भटक्या, विमुक्त आणि ओबीसी लोकांवर अन्याय करण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याचेही पडळकर म्हणाले.

महाज्योतीला निधी देताना हात थरथरतात का? पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा
महाज्योतीला निधी देताना हात थरथरतात का? पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा

By

Published : Jan 31, 2021, 12:45 PM IST

नागपूर-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका दिवसात सार्थी संस्थेला निधी देतात. मग महाज्योती संस्थेला निधी देताना हात थरथरतात का?”, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. महाज्योती संस्थेला 500 कोटी रुपयांचा निधी मिळावा, या मागणीच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “ओबीसी समाजाच्या महाज्योतीला 500 कोटी रुपये द्या”, अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.

महाज्योतीला निधी देताना हात थरथरतात का? पडळकरांचा अजित पवारांवर निशाणा


जर सरकारमध्ये ऐकत नसेल तर बाहेर पडा....
मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार ओबीसींना न्याय देण्याची भाषा करतात मात्र, ते कागदोपत्रीच आहे. जर सरकारमधील तुमचे कोणी ऐकत नसेल तर तुम्ही बाहेर पडत रस्त्यावर या असेही पडळकर म्हणाले. अजित पवार हे एका दिवसात सारथीला पैसे देतात पण त्यांना महाज्योतीला का पैसे देऊ वाटत नाही यांचे काय कारण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडी सरकार या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला.

प्रशिक्षण द्यायची आहे. पण व्यवस्था नियोजन काय...
राज्यसरकारचे महाज्योतीकडे दुर्लक्ष होत आहे. १० हजार पोलिसांना प्रशिक्षण देऊ असे वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, प्रशिक्षणाची कोणतीही व्यवस्था केलेली नसल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे. तसेच भटक्या, विमुक्त आणि ओबीसी लोकांवर अन्याय करण्याचे काम महाविकास आघाडी करत असल्याचेही ते म्हणाले.


ओबीसींची जनगणना करा आणि त्यानुसार निधी द्या....
ओबीसी आणि भटक्या जमातीची संख्या पाहता महाज्योतीला लोकसंख्येनुसार निधी दिला पाहिजे. ही सरकारची जवाबदारी आहे. यात गट- तटाचा विषय असण्याचे कारण नाही. ओबासींची जातीनुसार जनगणना व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले

ABOUT THE AUTHOR

...view details