नागपूर- पोलिसांच्या नावावर ५० हजारांची लाच मागणाऱ्या एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. मात्र,पोलिसांचे लक्ष नसल्याने संधीचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस स्टेशन मधूनच पळून गेल्याची घटना घडली आहे. रजत सुभाष ठाकूर असे फरार व्यक्तीचे नाव असून सीताबर्डी पोलीस ठाण्यातून पळून गेला.
पोलिसांच्या नावावर लाच मागणाऱ्याला अटक, संधी मिळताच फरार
पोलिसांच्या नावावर ५० हजारांची लाच मागणाऱ्या एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. मात्र, पोलिसांचे लक्ष नसल्याने संधीचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस स्टेशन मधूनच पळून गेल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार महिलेच्या नवऱ्याला देह-विक्री व्यवसायाच्या आरोपाखाली दीड महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात त्याला जामीन सुद्धा मिळाला होता, पण या बाबत आरोपी रजत सुभाष ठाकूर याला कोणतीही कल्पना नव्हती. आरोपी रजत ठाकूर याने त्या महिलेशी संपर्क साधून तिच्या पतीला जामीन मिळवून देण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. पोलिसांसोबत सेटिंग करून देण्यासाठी ही रक्कम असल्याचे त्याने त्या महिलेला सांगितले. शेवटी तडजोडी अंती सौदा १५ हजारांवर पक्का झाला, मात्र त्या महिलेला लाच देण्याची इच्छा नसल्याने तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून आरोपी रजत ठाकूर विरुद्ध तक्रार दिली.
तक्रार मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपी रजत ठाकूरला अटक केली. आरोपीला अटक करून पोलीस स्टेशनला आण्यात आले होते. मात्र, पोलिसांचे लक्ष नसल्याने संधीचा गैरफायदा आरोपी पोलीस स्टेशन मधूनच पळून गेला. आरोपी पळून गेल्याची माहिती समजताच पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. रात्रभर आरोपीचा शोध घेण्यात आला. मात्र, अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.