नागपूर: रॅगिंग प्रकरणात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सहा इंटर डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेंट्रल रॅगिंग कमिटीच्या आदेशानंतर मेडिकल महाविद्यालय प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काढला:महाविद्यालय रुग्णालयाच्या हॉस्टेल नंबर 5 मध्ये सीनियर इंटर डॉक्टरकडून एमबीबीएस प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग करण्यात आली होती. अमानवीय पद्धतीने रॅगिंग सुरू असल्याने काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओ काढला होता. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते की सीनियर डॉक्टरकडून ज्युनिअर डॉक्टरला मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात आहे.
रॅगिंग विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल:सेंट्रल रॅगिंग कमिटीच्या सूचनेनंतर मेडिकल प्रशासनाने कारवाई करत सुरुवातीला 6 डॉक्टर विद्यार्थ्यांना निलंबित करत हॉस्टेल खाली करायला सांगितले होते. आता या सहा विद्यार्थ्यांवर अजनी पोलीस ठाण्यात रॅगिंग विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण:रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग केल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएसचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर इंटर्नशीप करणारे आहेत.काही दिवसांपूर्वी रॅगिंगचा प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी घटनेची तक्रार आणि पुराव्यानिशी सेन्ट्रल रॅगिंग समिती केली होती. सेंट्रल रॅगिंग कमिटी कडून महाविद्यालय प्रशासनासोबत या संपूर्ण घटेनचा पाठपुरावा केल्यानंतर रॅगिंगचा आरोप असलेल्या सहा विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द करण्यात आली होती.
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय म्हणजेच मेडिकल कॉलेजमध्ये सीनिअरकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मेडिकल प्रशासनाने सहा इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई केली आहे. internship of six students canceled रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग केल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएसचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर इंटर्नशीप करणारे आहेत. काही दिवसांपूर्वी रॅगिंगचा प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांनी घटनेची तक्रार आणि पुराव्यानिशी सेन्ट्रल रॅगिंग समिती केली होती. सेंट्रल रॅगिंग कमिटी कडून महाविद्यालय प्रशासनासोबत या संपूर्ण घटेनचा पाठपुरावा केल्यानंतर रॅगिंगचा आरोप असलेल्या सहा विद्यार्थ्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द करण्यात आली आहे