नागपूर - येथील कोरोना रुग्णसंख्येत मागील 24 तासात रविवारी आलेल्या अहवालात 7771 बाधितांची भर पडली आहे. त्यात 87 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तेच पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 13 हजारांपर्यंत बाधितांची भर पडली. यात वाढती संख्या लॉकडाऊनमध्ये आटोक्यात आलेली नसल्याने तसेच मृत्यूच्या संख्येमध्ये वाढच असल्याने चिंता वाढली आहे.
नागपुरात रविवारी 7771 बाधितांची नोंद, 87 जणांचा मृत्यू
रविवारी आलेल्या अहवालात 24701 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरात 4720, ग्रामीणमध्ये 3040 जणांचा अहवाल कोरोना संक्रमित झाल्याचे पुढे आले आहे.
रविवारी आलेल्या अहवालात 24701 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये शहरात 4720, ग्रामीणमध्ये 3040 जणांचा अहवाल कोरोना संक्रमित झाल्याचे पुढे आले आहे. तर मृतांमध्ये शहरात 46 ग्रामीण भागातील 30, जिल्ह्याबाहेरील 11 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. यात 5130 जण कोरोनामुक्त झाले. यात शहरातील 3922 ग्रामीणमधील 1738 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 2,89,696 संक्रमित कोरोनामुक्त झाले असून, रिकव्हरी रेट 77.42 टक्के आहे. नागपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात संक्रमण झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 21 लाख 58 हजार 397 तपासणी करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 77 हजार 556 यात मागील काही दिवसात पूर्व विदर्भातही संक्रमण वाढत चालले आहे. यात सहा जिल्ह्यात 12 हजार 952 जण बाधित मिळाले. यात 8 हजार 818 जण कोरोनामुक्त झाले. यात 171 जण कोरोना बधितांचा मृत्यू झाला. भंडारा 1238, चंद्रपूर 703, गोंदिया 616, वर्ध्यात 796, गडचिरोली 335 हे बधितांची भर पडली आहे.