महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीची हत्या..  हत्येपूर्वी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

पीडित 5 वर्षीय बालिका शुक्रवार पासून लिंगा गावातील तिच्या घराजवळून बेपत्ता होती. ती गावातील एका भागात असलेल्या तिच्या घरातून त्याच गावात दुसऱ्या बाजूला असलेल्या तिच्या आजीच्या घरी गेली होती.

police thane kalmeshwar, nagpur
पोलीस ठाणे कळमेश्वर, नागपूर

By

Published : Dec 9, 2019, 12:34 PM IST

Updated : Dec 9, 2019, 2:09 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात लिंगा गावात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचे प्रयत्न केल्यानंतर तिची हत्या केल्याची घटना घडली. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी आरोपी संजय पुरी (वय 32) याला अटक केली आहे.

राकेश ओला (पोलीस अधीक्षक, शहर ग्रामीण पोलीस)

पीडित 5 वर्षीय बालिका शुक्रवार पासून लिंगा गावातील तिच्या घराजवळून बेपत्ता होती. घरातून ती त्याच गावात दुसऱ्या बाजूला असलेल्या तिच्या आजीच्या घरी गेली होती. आजीचे घर काही अंतरावर असल्याने ती नेहमी दोन्ही घरांमध्ये ये-जा करायची. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्यामुळे कुटूंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तसेच पोलिसांतही तक्रार दिली होती. रविवारी सकाळी तिचा मृतदेह गावात असलेल्या एका शेतात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळला. तिच्यावर अत्याचाराचे प्रयत्न झाल्याचे ही दिसून आले आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -संतापजनक...! नाशिकमध्ये सात वर्षीय बालिकेवर अत्याचार

आरोपी संजय हा त्याच परिसरातील एका शेतात सालगडी म्हणून कामाला होता. त्याला दारू पिण्याची सवय होती. घटनेच्या वेळी आरोपी हा दारू प्यायला होता. त्याच वेळी पीडित चिमुकली शेतातून जात असताना आरोपीची नजर तिच्यावर पडली. आरोपीने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलगी ओरडल्यामुळे आरोपीने तिच्या डोक्यात दगड टाकून तिची हत्या केली.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागल्याने आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांवर मोठा दबाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मृतक मुलीच्या वडिलांनी आरोपी संजय वर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे. यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानंतर आरोपीविरूद्ध हत्येसोबत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून रक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Last Updated : Dec 9, 2019, 2:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details