महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भासाठी १ लाख ५७ हजार कोरोना लसी'

विदर्भाच्या ११ जिल्ह्यांना कोरोना प्रतिबंधक लसींचा दुसरा डोस उपलब्ध झाला आहे. ११ जिल्ह्यांसाठी १ लाख ५७ हजार लसी प्राप्त झाल्या असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल यांनी दिली आहे. यामध्ये नागपूर विभागाला ९६ हजार तर अमरावती विभागासाठी ६१ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत.

By

Published : Jan 29, 2021, 6:05 PM IST

संजय जयस्वाल
संजय जयस्वाल

नागपूर - विदर्भाच्या ११ जिल्ह्यांना कोरोना प्रतिबंधक लसींचा दुसरा डोस उपलब्ध झाला आहे. ११ जिल्ह्यांसाठी १ लाख ५७ हजार लसी प्राप्त झाल्या असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल यांनी दिली आहे. यामध्ये नागपूर विभागाला ९६ हजार तर अमरावती विभागासाठी ६१ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी नागपूर जिल्ह्याला ३८५०० लसी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सध्या विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. देशात कोरोनाच्या विरोधात अभूतपूर्व असा लढा उभारल्या गेला, आणि त्यात आपल्याला लसीच्या रुपाने यश देखील मिळाले आहे. दोन लसींची निर्मिती करण्यात आपल्याला यश मिळाले आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेक आणि पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटने लस निर्माण केली आहे. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्यांनाच चार आठवड्यानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला टप्पा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण होत आहेत, त्यामुळे प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.

'लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भासाठी १ लाख ५७ हजार कोरोना लसी'

पहिल्या टप्प्यातील लसीकरण

कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून नागपूर जिल्ह्यातील १२ केंद्रांवर सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यासाठी ४२ हजार कोरोना डोस उपलब्ध झाले होते. पाहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी तब्बल १ लाख १४ हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते.

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण

कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यानंतर एक लाख ५७ हजार लसींची दुसरी खेप नागपूरमध्ये दाखल झाली आहे. संपूर्ण विदर्भासाठी १ लाख ५७ हजार बूस्टर लसींचा डोस मिळाला आहे. त्यापैकी नागपूर जिल्ह्याला 38,500 लस, भंडारा 7,500 लस, चंद्रपूर 16,000 लस, गडचिरोली 9500 लस, गोंदिया जिल्ह्याला 8000 लस, वर्धा 16,500, अकोला 9000, बुलडाणा 17,500, वाशीम 5000, यवतमाळ 15000 आणि अमरावती 14500 अशा एकूण एक लाख ५७ हजार लसी उपब्ध झाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details