मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ( Largest Slum in Asia ) म्हणून प्रसिद्ध असलेली धारावी कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ( Corona in Dharavi ) बनली होती. धारावीकरांची साथ, धारावी मॉडेलची अंमलबजावणी ( Dharavi Corona Preventive Model ) यामुळे धारावीतील कोरोना आटोक्यात आला. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. मात्र, महिनाभरातच धारावीतील कोरोना आटोक्यात आला. धारावीत तिसऱ्या लाटेत आज दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. ( Zero Corona Patients Found in Dharavi )
दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद -
मुंबईत ११ मार्च २०२० ला कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. या पहिल्या लाटेत धारावीत १ एप्रिल २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. ३ मे २०२० ला सर्वाधिक ९४ रुग्णांची नोंद झाली. २५ डिसेंबर २०२० ला पहिल्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली. पहिली लाट ९ महिने होती या लाटेत ३७८८ रुग्णांची नोंद झाली. १५ फेब्रुवारी २०२१ पासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. ८ जून २०२१ ला सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली. १४ जून २०२० ला पहिल्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली. दुसरी लाट ५ महिने होती या लाटे दरम्यान २८८१ रुग्णांची नोंद झाली. २७ डिसेंबरला २०२१ पासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. ७ जानेवारी २०२२ ला सर्वाधिक १५० रुग्णांची नोंद झाली. तिसऱ्या लाटेत २८ जानेवारीला पहिल्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर आज १२ जानेवारीला दुसऱ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
धारावीत २३ सक्रिय रुग्ण -