महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 1, 2021, 2:12 PM IST

ETV Bharat / state

इन्स्टाग्रामवर मैत्री, दोघांचा प्रेमविवाह आणि दोन महिन्यात पत्नीची आत्महत्या

प्रेमविवाहानंतर केवळ दोन महिन्यांत या दोघांमध्ये खटके उडू लागले होते. सुरुवातीला या विवाहाला कोमल अग्रवाल हिच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र, त्यानंतरही या दोघांनी प्रेमविवाह केला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून युट्यूब ब्लॉगर जितेंद्र अग्रवाल याच्याकडून कोमल हिला मारहाण केली जात होती.

YouTube blogger's wife commits suicide
YouTube blogger's wife commits suicide

मुंबई -इन्स्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर एका युट्युब ब्लॉगर सोबत प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीने लग्नाच्या दोन महिन्यात आत्महत्या केली आहे. लग्नानंतर केवळ दोन महिन्यात या 23 वर्षीय तरुणीने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. यासंदर्भात युट्युब ब्लॉगर पतीला भांडुप पोलिसांनी अटक केलेली आहे.

केवळ 2 महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह -

या प्रकरणातील पीडित मुलगी कोमल अग्रवाल (23)हिने इंस्टाग्राम वर मैत्री झालेला युट्युबर जितेंद्र अग्रवाल (26) याच्या सोबत प्रेम विवाह 14 एप्रिल रोजी केलेला होता. लग्नानंतर केवळ दोन महिन्यांत या दोघांमध्ये खटके उडू लागले होते. सुरुवातीला या विवाहाला कोमल अग्रवाल हिच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र, त्यानंतरही या दोघांनी प्रेमविवाह केला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून युट्यूब ब्लॉगर जितेंद्र अग्रवाल याच्याकडून कोमल हिला मारहाण केली जात होती. घरच्या कामावरून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचं कोमलच्या कुटुंबीयांनी आरोप केलेला आहे. याबरोबरच कोमल अग्रवाल हिने लग्न करताना तिच्या माहेरच्यांकडून कुठल्याही प्रकारचा हुंडा किंवा पैसे आणले नाही. यामुळे जितेंद्र अग्रवाल हा कोमल हिला त्रास देत होता. असा आरोप कोमलच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आरोपीला अटक -

अशाच प्रकारच भांडण 27 मे रोजी झाल्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोमल अग्रवाल हिने तिच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर तिच्या या मृत्यूला तिचा पती जबाबदार असल्याचा आरोप कोमलच्या कुटुंबीयांनी केलेला आहे. त्यानुसार भांडुप पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंद करून अंकित अग्रवाल यास अटक केली आहे.

हेही वाचा - ठाण्यात तीन चिल्लरचोर गजाआड; १ लाख १२ हजारांची चिल्लर केली जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details