मुंबई- येथील वरळी सी-लिंकवर मंगळवारी सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा एका १८ वर्षाच्या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वरळी सी-लिंकवर तैनात असलेल्या गार्डने युवकाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी गार्डसोबत झालेल्या झटापटीत युवकाने त्याच्याजवळील चाकूने स्वतःच्या गळ्यावर व हातावर वार करून घेतले. मात्र, त्याला तत्काळ भाभा रुग्णालयात वरळी पोलिसांनी दाखल केल्याने या युवकाचे प्राण वाचले आहेत.
वरळी सी-लिंकवर युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
वरळी सी-लिंकवर मंगळवारी सकाळी एका १८ वर्षाच्या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वरळी सी-लिंकवर तैनात असलेल्या गार्डने युवकाला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी गार्डसोबत झालेल्या झटापटीत युवकाने त्याच्याजवळील चाकूने स्वतःच्या गळ्यावर व हातावर वार करून घेतले. मात्र, त्याला तत्काळ भाभा रुग्णालयात वरळी पोलिसांनी दाखल केल्याने या युवकाचे प्राण वाचले आहेत.
उजयकुमार परमार (१८) असे या युवकाचे नाव आहे. २०१७ साली तो गुजरातमधील बडोदा येथील देसर गावातून पळून मुंबईत दाखल झाला होता. यादरम्यान त्याने त्याच्या घरच्यांशी संपर्क करणे सोडले होते. बडोदा पोलिसांनी यासंदर्भात उजयकुमार परमार हरविल्याची तक्रारसुद्धा नोंदविली होती. तर २०१७ पासून तो वरळी कोळीवड्यात राहत होता व दादर येथील कपड्याच्या दुकानात काम करीत होता. आई वडिलांची आठवण येत असल्याने नैराश्येपोटी आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याने वरळी पोलिसांना सांगितले आहे.