मुंबई -पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. या मोर्चाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या मोर्चात मुस्लीम बांधवही सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.
मुस्लीम समाजातील तरुणांचा राज ठाकरेंच्या मोर्चाला पाठींबा हेही वाचा -'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'
राज ठाकरे यांची भूमिका आम्हाला मान्य आहे. मी महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेला मराठी मुस्लीम आहे. राज ठाकरेंची भूमिका मुस्लीम समाजाच्या विरोधात नसून पाकिस्तान आणि बांगलादेशाच्या घुसखोरांच्या विरोधात आहे. हे समजून घेतले पाहिजे, असे मनसे कार्यकर्ते साजिद अन्सारी यांनी सांगितले.
हेही वाचा -राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे....
दरम्यान, या मोर्चात तरुण कार्यकर्ते ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. कल्याणवरून आलेला अंकित राजपूत यांनी घातलेला आगळावेगळा कुर्ता हा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या कुर्त्यावर राज ठाकरे यांचे चित्र होते आणि त्यांच्या हातात हंटर दाखवत ते घुसखोरांना पळवत आहेत, असे दाखवण्यात आले होते. आम्हाला राज ठाकरे यांची भूमिका पटली आहे. ती इतरांना ही कळावी, यासाठी मी हे चित्र काढले असल्याचे अंकितने सांगितले.