मुंबई -शहरातील एका महिलेने दुसऱ्याच्या मुलांना शाळेत सोडून मिळालेल्या तुटपुंज्या पगारावर स्वतःच्या मुलांना शिकवण्याचा ध्यास घेतला आहे. आज त्यांची एक मुलगी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे, तर मुलगा पदवीचे शिक्षण घेत आहे. ४८ वर्षीय भक्ती वारखंडकर यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे.
मुलांसाठी महिलेचा संघर्ष, दुसऱ्याच्या मुलांना शाळेत सोडून पूर्ण करताहेत स्वतःच्या मुलांचे शिक्षण
गेल्या १५ वर्षांपासून त्या मुलांना शाळेत सोडण्याचे काम करत आहेत. आता त्यांच्याकडे २२ मुले आहेत. त्यांना त्या शाळेत सोडतात. सकाळी ७ वाजता सुरू झालेले काम सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. यामधून त्यांना महिन्याला ७ हजार रुपये मिळतात. अंत्यत गरीब परिस्थितीतून त्यांची मुले शिकली. याचा आनंद असल्याचे भक्ती म्हणतात.
भक्ती वारखंडकर यांच्या पतीचा २००३ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पदरात त्यावेळी दोन लहान मुले होती. मुलगा पहिलीला तर मुलगी शिशू वर्गात शिकत होती. पतीच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मुलांचे शिक्षण कसे करायचे? उदरनिर्वाह कसा करायचा? असे गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले होते. मात्र, त्या खचल्या नाही. त्यांनी कामाला जाणाऱ्या दाम्पत्यांच्या मुलांना शाळेत सोडण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला दोन मुलांना शाळेत सोडण्याचे काम भक्ती यांना मिळाले. त्यामधून त्यांना ६०० रुपये मिळायचे. त्यांनी तुटपूंज्या पैशातून मुलांना शिकवले.