महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Attack On Arun Gawli Handiwork : अरुण गवळीच्या हस्तकावरील हल्ला प्रकरण! आरोपीला साक्षीदाराने न्यायालयात ओळखले

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तक फारुख मोहम्मद याला आज डॉन अरुण गवळी याच्या हस्तकांना जे जे रुग्णालयात झालेल्या फायरिंग (J J Hospital Firing) दरम्यान प्रकरणात आज साक्षीदाराने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष TADA कोर्टात साक्षी दरम्यान ओळखले (witness identified accused attack) आहे. या प्रकरणात साक्षीदाराची उलट तपासणी 14 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी दरम्यान होणार आहे. (attack on Arun Gawli handiwork)

Mumbai Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय

By

Published : Oct 31, 2022, 9:44 PM IST

मुंबई :अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तक फारुख मोहम्मद याला आज डॉन अरुण गवळी याच्या हस्तकांना जे जे रुग्णालयात झालेल्या फायरिंग (J J Hospital Firing) दरम्यान प्रकरणात आज साक्षीदाराने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष TADA कोर्टात साक्षी दरम्यान ओळखले (witness identified accused attack) आहे. या प्रकरणात साक्षीदाराची उलट तपासणी 14 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी दरम्यान होणार आहे. सरकारी पक्ष या प्रकरणात एकूण 10 साक्षीदारांची साक्ष तपासणार आहे. या प्रकरणाची ट्रायल 20 वर्षानंतर सुरू झाली आहे. (attack on Arun Gawli handiwork)

दाऊद इब्राहिमच्या हस्तकाची गोळी झाडून हत्या-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरची हत्या करणारे डॉन अरुण गवळीच्या व्यक्तींना जे जे रुग्णालयात दाऊद इब्राहिमच्या हस्तकानी गोळी हत्या केली होती. डॉन अरुण गवळीच्या व्यक्तींना जे जे रुग्णालयात दाऊद इब्राहिमच्या हस्तकनी मारल्यानंतर मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण देश हा धरून गेले होते या प्रकरणातील दाऊद इब्राहिम चे हस्तक यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात 20 वर्षानंतर आज 19 ऑक्टोंबर बुधवार रोजी ट्रायल कोर्टात खटला सुरू होणार होता. आता या प्रकरणात 14 नोव्हेंबर रोजी जबाब नोंदवण्यात येणार आहे.


इब्राहिम पारकरची अरुण गवळी टोळीकडून हत्या -मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये 1992 मध्ये अरुण गवळीचे हस्तगत यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीतील व्यक्तींकडून ठार मारण्यात आले होते. आरोपी यासीन मन्सूर मोहम्मद फारुख ऊर्फ फारुख टकला याच्याविरुद्ध सत्र न्यायालयात हा खटला चालणार आहे. त्याच्यावर आरोपनिश्चिती करण्यात आली असून न्यायालयाने 19 ऑक्टोबरपासून सरकारी पक्षाला साक्षीदारांना हजर करण्यास मुभा दिली होते. दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकरची अरुण गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून दाऊद टोळीच्या शार्पशूटर्सनी 22 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये अंदाधुंद गोळीबार करून दहशतीचे थैमान माजवले होते. या प्रकरणात दाऊदचा जवळचा साथीदार फारुख टकला याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात बंदिस्त आहे.


न्यायालयाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब-शूटआऊट घडून 20 वर्षे उलटल्यानंतर त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. न्यायाधीशांनी 19 ऑक्टोबरपासून साक्षीदारांची साक्ष तपासण्यास सरकारी पक्षाला परवानगी दिली आहे. या प्रकरणात एकूण 77 साक्षीदार असून फारुख टकलाविरुद्ध सरकार पक्षाकडून 10 साक्षीदार हजर केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे Adv. करण जैन, तर सरकारी पक्षातर्फे Adv. घोन्साल्विस युक्तिवाद करणार आहेत. शूटआऊट प्रकरणातील इतर सर्व आरोपी यापूर्वीच दोषी ठरले असून सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे.


बदल्याच्या भावनेतून हत्या -दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकरची अरुण गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून दाऊद टोळीच्या शॉपशूटर्सनी 22 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. हॉस्पिटलच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये अंदाधुंद गोळीबार करून दहशतीचे थैमान माजवले होते. या प्रकरणात दाऊदचा जवळचा साथीदार फारुख टकला याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याचे दुबईतून प्रत्यार्पण करण्यात आले होते. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात बंदिस्त आहे. शूटआऊट घडून वीस वर्षे उलटल्यानंतर त्याच्याविरोधात आरोपनिश्चिती करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details