मुंबई: शिवसेना संपवायचा अनेकदा प्रयत्न केला. जेवढे प्रयत्न होतात, शिवसैनिक तेढव्या जोमाने काम करतात. आताही शिवसेना संपवायला निघालेल्यांना कल्पना नव्हती. पण ज्यावेळी शिवसेनेवर आघात झाले, तेव्हा ती दसपटीने नाहीतर शतपटीने मोठी झाली. आजही शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ मोठा आहे, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे. Uddhav Thackeray Challenge To shinde Group ठाण्यातही शिवसेनेचा आवाज कायम असल्याचे ठाकरे म्हणाले.
भाजप शिंदे आणि राज ठाकरेंवर टीकाशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी मंत्री आणि यवतमाळचे भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे गटातील संजय राठोड यांचे ते विरोधक मानले जातात. त्यांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप शिंदे आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. शिंदे गटाला निवडणूकच लढवायची नव्हती, तर माझे चिन्ह गोठवण्याची एवढी घाई कशासाठी केली, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिंदेंनी शिवसेनेचे चिन्ह गोठवले, नाव गोठवले आणि लढायला, मात्र भाजपला पुढे केले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार माघारी घ्यावा, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली. ही विनंती भाजपने राज ठाकरेंकडून करुन घेतल्याचा आरोप केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून शिंदे भाजपाला खडे बोल सुनावले आहे. अंधेरी पोट निवडणुकीत भाजपला तोंडावर आपटण्याची भीती होती. त्यामुळे निवडणुकीत माघार घ्यायची होती. स्वतःला माघार घेता येत नव्हती. त्यामुळे कुणाला तरी विनंती करावी लागली. विनंती करा… विनंती करा म्हणून फिरत होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.