महाराष्ट्र

maharashtra

सावधान! रेल्वे रूळ ओलांडाला तर ‘यमदूत’ उचलून नेणार

रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी वारंवार स्थानकांवर उद्घोषणा केली जाते. मात्र, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाहीत.

By

Published : Nov 7, 2019, 8:14 PM IST

Published : Nov 7, 2019, 8:14 PM IST

Updated : Nov 8, 2019, 8:33 AM IST

रेल्वे रूळ ओलंडाल तर ‘यमदूत’ उचलून नेणार

मुंबई- लवकर जाण्याचा घाईत रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवासी आपला मौल्यवान जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बल व पश्चिम रेल्वेने अंधेरी, मालाड, माहिम व दादर स्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवली. यावेळी रूळ ओलांडणाऱ्यांवर प्रत्यक्षात यमदूताने कारवाई केली.

पश्चिम रेल्वेची जनजागृती मोहिम

रेल्वे रूळ ओलांडू नये, यासाठी वारंवार स्थानकांवर उद्घोषणा केली जाते. मात्र, प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव गमावून बसतात. अनेक उपाययोजना, जनजागृती करूनही प्रवासी ऐकत नाही. त्यामुळे आज पश्चिम रेल्वेने एक वेगळा प्रयोग राबवत जनजागृती केली. यावेळी जो कोणी रेल्वे रुळ क्रास करेल त्याला यम उचलून नेत होता.

हेही वाचा -मी पुन्हा येईन...'गप्प बसा', शिवसेनेची मुंबईत बॅनरबाजी

नागरिकांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडू नये, यासाठी हा प्रयोग हाती घेतला असून वेगवेगळ्या स्थानकात असे यमराज पाहायला मिळतील, असे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हिड यांनी सांगितले.

हेही वाचा - शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत

Last Updated : Nov 8, 2019, 8:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details