महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सायन स्थानकातील पाणी उपसा करणारे पंप रात्री बंदच; रुळावर सकाळी पाणीच पाणी

बुधवारी मध्यरात्री कोसळत असलेल्या पावसाचे पाणी सायन रेल्वे स्थानकातील 4 ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी पंप चालकाने रात्री पंप चालू न करता सकाळी केले, यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

By

Published : Jul 24, 2019, 4:05 PM IST

मुंबई

मुंबई- सायन रेल्वे स्थानक व परिसरातील सखल भागात पाणी उपसा करणारे पंप रात्री बंद असल्याने रेल्वे रुळावर आज सकाळी पाणी मोठ्या प्रमाणात भरले होते. सायन ते कुर्ला रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.

मुंबईत 3 आठवड्याच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाने जोर धरला होता. बुधवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला तरी सकाळी शहर व उपनगरातील सखल भागातील पाणी निचरा होण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

रेल्वेकडून पावसाळ्यात रुळावर पावसाचे पाणी जमा होऊ नये यासाठी सखल भागात पाणी उपसा करणारे पंप बसवले जातात. या पंपाच्या देखरेखीसाठी काही कामगार पाऊस कोसळत असलेल्या वेळात कार्यरत असतात. यामुळे जमा झालेले पावसाचे पाणी लवकर उपसा होऊन रेल्वे सेवा सुरळीत चालू राहते. मात्र, बुधवारी मध्यरात्री कोसळत असलेल्या पावसाचे पाणी सायन रेल्वे स्थानकातील 4 ही मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी पंप चालकाने रात्री पंप चालू न करता सकाळी केले, यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असल्याचे येथील कर्मचाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details