मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यामुळे देश अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मी प्रचार करणार आहे. लोकांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानीही तसा प्रचार करावा असे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले आवाहन भाजपच्या जिव्हारी लागले आहे. राज ठाकरे यांचे रंगशारदा येथील भाषण संपताच भाजपचे नेते व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेवर जोरदार टीका केली. मनसेने निवडणूक लढवून आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे असे थेट आव्हानच तावडे यांनी मनसेला दिले आहे.
निवडणूक लढवून डिपॉझिट वाचवून दाखवावे, विनोद तावडेंचे मनसेला आव्हान
राज ठाकरे यांचे रंगशारदा येथील भाषण संपताच भाजपचे नेते व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेवर जोरदार टीका केली. मनसेने निवडणूक लढवून आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे असे थेट आव्हानच तावडे यांनी मनसेला दिले आहे.
तावडे म्हणाले, की वांद्र्याच्या रंगशारदामध्ये रोज नाटके होतात. आज राज ठाकरेंचे वेगळे नाटक पाहायला मिळाले. मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, हा बारामतीचा पोपट आहे. ते आज अधोरेखित झाले आहे. आजच्या राज ठाकरेंच्या भाषणातून ते स्पष्ट झाले.
मनसेने राज्यात राष्ट्रवादीचा कोणत्याही मतदार संघात लोकसभेची निवडणूक लढवावी आणि आपले डिपॉझिट वाचवून दाखवावे, असे आव्हान तावडे यांनी मनसेला केले. राज ठाकरे हे अतिशय सूज्ञ नेते आहेत. तरीसुद्धा आपल्या सैन्यानी जी कामगिरी केली. त्यावर अशा पध्दतीने बोलणे हा सैन्याचा अपमान आहे. त्यामुळे ते पाकिस्तानचे हिरो होऊ इच्छितात का? असा सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. पोपटाचा रंग हिरवा असतो, त्यामुळे तो पाकिस्तानचा तरी नाही का? असा मला प्रश्न पडतोय अशी प्रतिक्रियाही तावडे यांनी यावेळी दिली.