चंद्रपूर- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात मेगाभरती होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपच्या गळाला लागले असून ते आणखी अनेक नेत्यांच्या संपर्कात आहे, याचा खुलासा आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केला.
भाजपकडून पुन्हा विरोधी पक्षनेता पळवण्याचे प्रयत्न, विजय वडेट्टीवार मुंबईत करणार खुलासा
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपच्या गळाला लागले असून ते आणखी अनेक नेत्यांच्या संपर्कात आहे. याचा खुलासा आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात केला.
विजय वडेट्टीवार, विधानसभा विरोधी पक्षनेते
याबरोबरच आपल्याला वांद्रे येथून वारंवार फोन येत असून आपल्याला भेटायचे आहे, असे ते सांगत आहेत. मात्र, हे फोन नेमके कोण करत आहे, याचा खुलासा मुंबईच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. दरम्यान, वांद्रे हा शिवसेनेचा गड आहे. वडेट्टीवार हे यापूर्वी सेनेत होते, त्यामुळे त्यांची घरवापसी करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून होणार का? असे वाटत होते. मात्र, त्यांनी हा फोन शिवसेनेकडून आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Last Updated : Aug 1, 2019, 7:33 PM IST