मुंबई- प्रकाश आंबोडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्याच यादीमध्ये 22 जागांवर उमेदवारांची नावे वंचितने जाहीर केली आहेत.
प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी प्रमुख एमआयएमने वंचितसोबत युती तोडत वेगळी चूल मांडली होती. त्यानंतर एमआयएमने 2 याद्या जाहीर केली होत्या. मात्र, तरीही वंचित एमआयएमसोबत आघाडीसाठी प्रतिक्षेत होती. मात्र, आज प्रकाश आंबोडकर यांनी अखेर वंचितची पहिली यादी जाहीर केली.
हेही वाचा - एमआयएम विधानसभेच्या 20 टक्के जागा लढवणार - इम्तियाज जलील
कर्जत जामखेडमधून अरुण जाधव, लातूर शहरातून मनियार राजासाब, जळगावमधून शेख शफीअब्दुल नबीशेख, शिवाजीनगर अनिल कुऱ्हाडे यासह 22 मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. तर यावेळेसही वंचित आघाडीने उमेदवारबरोबर त्यांच्या जातीचाही उल्लेख केला आहे.
- सुरेश जाधव, शिराळा, रामोशी
- डॉ.आनंद गुरव, करविर, गुरव
- बबनराव उर्फ दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर, गोंधळी
- बाळकृष्ण शंकर देसाई, कराड- दक्षिण, लोहार
- डॉ.बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव, नंदीवाले
- दिपक नारायण शामदिरे, कोथरूड, कैकाडी
- अनिल शंकर कु-हाडे, शिवाजी नगर, वडार
- मिलिंद ई. काची, कसबा पेठ, काची- राजपूत,
- शहानवाला जब्बार शेख, भोसरी, छप्परबंद
- शाकिर इसालाल तांबोळी, इस्लामपूर, तांबोळी
- किसन चव्हाण, पाथर्डी, शेवगाव, पारधी
- अरुण जाधव, कर्जत जामखेड, कोल्हाटी
- सुधीर शंकरराव पोतदार, औसा, सोनार
- चंद्रलाल वकटुजी मेश्राम, ब्रम्हापुरी, ढिवर
- अरविंद सांडेकर, चिमूर, माना
- माधव कोहळे, राळेगाव, गोवारी
- शेख शफी अब्दुल नबी शेख, जळगाव, पटवे, मुस्लीम,
- लालसू नागोटी, अहेरी, माडिया
- मणियार राजासाब, लातूर शहर, मणियार
- नंदकिशोर कूयटे, मोर्शी, भोई
- अॅड.आमोदबावने, वरेरा, ढिवर
- अशोक विजय गायकवाड, कोपरगाव, भिल्ल