मुंबई - मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांवरून सुरू झालेल्या हा वाद आता पुन्हा महिला आयोगाकडे गेला आहे. अगोदर उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र आता महिला आयोगाकडे तक्रार करणाऱ्या चित्रा वाघ यांच्या विरोधातच उर्फीने तक्रार दाखल केली आहे. आपली प्रतिमा मलिन करून आपल्यावर हल्ला होण्याची भीती उर्फीने तक्रारीत व्यक्त केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडे तक्रारभाजप नेत्या चित्रा वाघ यांना ट्विटरवर तोडीस तोड उत्तर देणारी अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदने आता चित्रा वाघ यांच्या विरुद्ध थेट महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे. वकील नितीन सातपुते यांनी थेट चित्रा वाघ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अशा आशयाचा तक्रार अर्ज त्यांनी महिला आयोगाला मेल केला आहे. उर्फीचे वकील नितीन सातपुते यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
चित्रा वाघ लोकांना भडकवत असल्याचा आरोपचित्रा वाघ या लोकांना उर्फी जावेद यांच्या ड्रेसिंग स्टाईलवरून लोकांना त्यांच्या विरोधात भडकवत आहेत. वाघ यांनी उर्फी जावेदला थोबाडीत मारणार असल्याची धमकी दिल्याचा देखील या तक्रार अर्जात उल्लेख आहे. ड्रेसिंग स्टाईलवरून उर्फीला टारगेट केले जात असून त्याचा उद्देश उर्फीची प्रतिमा जनमानसात मलिन करण्याचा दावा सातपुते यांनी केला आहे. या तक्रार अर्जात चित्रा वाघ यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच भारतीय दंडविधानाच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी सातपुते यांनी महिला आयोगाकडे केली आहे.
उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांच्याविरोधात ट्विटचित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कपड्यावरुन टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात वाद सुरू झाला. या वादात चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करत महिला आयोग काय करत आहे, असा सवाल केला. मात्र त्यानंतर रुपाली चाकणकर यांनीही चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा - Chitra Wagh : अशा मला 56 नोटीसा आल्या, तुमच्या नोटीसींना मी घाबरत नाही - चित्रा वाघ