मुंबई- राज्यात पुढील दोन दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून या परिस्थितीत काहीही निर्माण होऊ शकते. आम्ही केवळ 'वेट अँड वॉच' ची भूमिका बजावत असून आघाडी म्हणून सर्व निर्णय शरद पवार घेतील, असे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
'पुढील दोन दिवस महत्त्वाचे, राजकीय परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून'
राज्यात पुढील दोन दिवस राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून या परिस्थितीत काहीही निर्माण होऊ शकते. आम्ही केवळ 'वेट अँड वॉच' ची भूमिका बजावत असून आघाडी म्हणून सर्व निर्णय शरद पवार घेतील, असे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
तटकरे म्हणाले की, राज्यात ज्यांना बहुमत मिळाले आहे, त्यांनी सत्ता स्थापन करावी. नसेल तर पुढे काय परिस्थिती निर्माण होईल यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. राष्ट्रवादीचे आमदार निष्ठावंत असून उद्या काहीही परिस्थिती निर्माण झाली, तरी आमचा एकही आमदार फुटणार नाही. राज्यातील एकूण परिस्थिती पाहून राज्यपालांनी पुढाकार घेऊन शेतकर्यांना केंद्राकडून मदत मिळण्यासाठी कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने मदत केली पाहिजे. राज्यात पाच विभागात महसूल विभागाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळावी, असेही तटकरे म्हणाले.