मुंबई -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम २९४,५०६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी फोन करून अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ( Unknown person called Sharad Pawar ) तपास सुरू केला आहे. धमकी देण्याच्या प्रकरणात नारायण सोनी नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. तो बिहारचा रहिवासी आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.
कॉलरने हिंदीत धमकी दिलीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर अज्ञात व्यक्तीने फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली व मुंबई आकाराचे देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचे सांगितले. कॉलरने हिंदीत धमकी दिली, धमकी दिल्यानंतर गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध काल गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भादंवि कलम २९४,५०६(२) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
फोन करणाऱ्याची ओळख पटलीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याची ओळख पटली आहे. यापूर्वीही याच व्यक्तीने पवार यांना फोनवरून धमकी दिली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि समजावल्यानंतर सोडून दिले. आता पुन्हा त्याच व्यक्तीने धमकी दिली आहे त्यामुळे यावेळी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून लवकरच अटक करण्यात येईल असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. अज्ञात व्यक्तीने काल सिल्व्हर ओक निवासस्थानी फोन करून धमकी दिली होती. त्यांनी शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सिल्व्हर ओक येथे तैनात असलेल्या एका पोलीस फोन ऑपरेटरने पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
शरद पवारांच्या वाढदिवसानंतर दुसऱ्या दिवशीच धमकी :सोमवारीच शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर आज त्यांना आलेल्या धमकीच्या फोनने खळबळ उडाली आहे. धमकी देणारा व्यक्ती बिहारचा रहिवासी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवार यांच्या घरी नारायण सोनी नावाची व्यक्ती फोन करत असल्याचे बोलले जात आहे.