महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणवेश आणि इतर शालेय साहित्यांसाठी विद्यार्थ्यांना 'तारीख पे तारीख'

मागील वर्षी या सर्व वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचल्या होत्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही या वस्तू शाळेच्या पहिल्यादिवशी मिळतील अशी अपेक्षा विद्यार्थी व त्यांच्या पालकांना होती. मात्र, शाळा सुरू होऊन चौथा महिना उजाडला तरी या वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सुरू आहे.

अंजली नाईक शिक्षण समिती अध्यक्षा

By

Published : Sep 13, 2019, 9:27 PM IST

मुंबई -शैक्षणिक सत्र सुरु होऊन चार महिने झाले तरी पालिका शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांना गणवेश आणि 27 शालेय वस्तू अद्याप मिळालेले नाहीत. गणवेश आणि रोटर साहित्य पुरवण्यासाठी कंत्राटदारांना 5 सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, ही डेडलाईन कंत्राटदारांनी पाळलेली नाही. यामुळे आता पुन्हा 30 सप्टेंबरपर्यंत ही नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. कंत्रादारांकडून शालेय वस्तू आणि गणवेष देण्यासाठी तारीख पे ताऱीख दिली जात असल्याने विद्यर्थ्यांचे मात्र त्यामुळे हाल होत आहेत.

गणवेश आणि इतर शालेय साहित्यासाठी विद्यार्थ्यांना तारीख पे तारीख

मागील वर्षी या सर्व वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचल्या होत्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षातही या वस्तू शाळेच्या पहिल्यादिवशी मिळतील अशी अपेक्षा विद्यार्थी व त्यांच्या पालकांना होती. मात्र, शाळा सुरू होऊन चौथा महिना उजाडला तरी या वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे पालकांमध्ये नाराजीचा सुरू आहे. याचे पालिका शिक्षण समितीच्या बैठकीत याबाबत पडसाद उमटले. शालेय वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत का पोहचल्या नाहीत याचा जाब शिक्षण समिती सदस्यांनी प्रशासनाला विचारला होता. प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांनी धारेवर धरत चांगलेच खडसावले होते. त्यानंतर 5 सप्टेंबरपर्यंत या वस्तूंचा पुरवठा झाला नाही तर, संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल. असा इशारा शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी दिला होता. मात्र, आतापर्यंत शालेय वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत.

हे ही वाचा -मुंबई तुंबल्याने १४ हजार कोटींचा फटका, श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही वह्या देण्यात आलेल्या नाहीत. शालेय वस्तूंचा पुरवठा जुलै महिन्यात करण्यात येणार होता. मात्र, ऑगस्ट महिना संपला तरीही या वस्तूंचा पुरवठा कंत्राटदाराने केलेला नाही. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल. असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुन्हा 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत विधानसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाला पत्र देऊन शालेय वस्तू दिल्या नाही तर, विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे निदर्शनास आणले जाईल. सध्या उशिरा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना लावण्यात आलेला दंड दुप्पट करण्यात आला असून 30 सप्टेंबर पर्यंत गणवेश व वस्तू न दिल्यास त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल असे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी सांगितले.

हे ही वाचा -पैसा आणयचा तरी कुठून? मुंबई महापालिकेच्या आर्थिक अडचणीत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details