महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray : राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा, महाराष्ट्र बंद करण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना न हटवल्यास महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला (Uddhav Thackerays warning) आहे. (Bhagat Singh Koshyaris controversial statement) ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोश्यारी यांच्यासह भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

By

Published : Nov 24, 2022, 5:28 PM IST

Updated : Nov 24, 2022, 7:14 PM IST

Uddhav Thackerays warning to Maharashtra Bandh against Governor Bhagat Singh Koshyari's controversial statement
राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा.. महाराष्ट्र बंद करण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई :उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांना हटवण्याची मागणी केली. या मागणीबाबत त्यांनी 'महाराष्ट्र बंद'चे संकेत दिले.राज्यपालांच्या विरोधात प्रसंगी महाराष्ट्र बंद करण्यात येईल. त्यांना माघारी न पाठवल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला(Uddhav Thackerays warning to Maharashtra Bandh) आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोश्यारी यांच्यासह भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.

राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा, महाराष्ट्र बंद करण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा

बाप हा बाप असतो -ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले की, कुणीही टपली मारावी असं वातावरण राज्यात झालं आहे. वृद्धाश्रमात जागा नाही त्यांना राज्यपाल करून ठेवलं आहे. राज्यपाल निष्पक्ष असावेत असा आपला समज. बाप हा बाप असतो त्यांना जुन, नवं कसं करता. सडक्या मेंदूच्या मागे कोण याचा शोध घेतला पाहिजे. राज्यपालपदाची झूल पांघरून वेडीवाकडी विधान (Bhagat Singh Koshyaris controversial statement) करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

दोन दिवसांचा अल्टीमेटम:आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांवर अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि उदयनराजे यांच्या वंशजांनी मागणी केली आहे, त्यावर शरद पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे, हीच वेळ आहे की मी महाराष्ट्रातील सर्व घटकांना आणि पक्षांना येत्या दोन दिवसांत एकत्र यावे आणि राज्यपालांना हटवावे. आंदोलन केल्याशिवाय आता काम होणार नाही. जीभ घसरणे एकदाच होऊ शकते, वारंवार नाही.

Last Updated : Nov 24, 2022, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details