मुंबई :आपण एमबीए MBA चायवाला, बी टेक चायवाली आणि ग्रॅज्युएशन चायवाली यांच्यासारख्या चहाच्या स्टार्टअपबद्दल ऐकले असेल. मात्र ऑडीसारख्या महागड्या गाडीत चहा विकला जात असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? तर आम्ही तुम्हाला मुंबईतील ऑडी कारमधून चहा विकणाऱ्या मुंबईतील या दोन तरुणांची माहिती आज देणार आहोत. अमित कश्यप आणि मन्नू शर्मा असे त्या ऑडी चायवाल्या तरुणांची नावे आहेत. मुंबईत लोखंडवाला बॅकरोड येथे त्यांचा रोज चहाचा स्टॉल लागत आहे. ऑडी कार रस्त्याच्या कडेला उभी करून टेबलवर हे तरुण चहा बनवतात. त्यांच्या या महागड्या स्टॉलवर अनेक ग्राहक चहा पिताना दिसतात.
आलिशान ऑडी कारमधून मुंबईच्या रस्त्यावर तरुण विकतात चहा चालती आलिशान कार बनली चहाची टपरी :मुंबईत चालती आलिशान कार चहाची टपरी बनल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. आरामदायी प्रवासासाठी लोक ऑडी लक्झरी कार वापरतात. तर मन्नू शर्मा आणि अमित कश्यप हे या वाहनावर चहाचे स्टॉल लावत आहेत. मन्नू आणि अमित 75 लाख रुपयांच्या आलिशान कारमध्ये 20 रुपयांना चहा विकत आहेत. त्यांची ही आलिशान कार अंधेरीच्या पश्चिम उपनगरातील लोखंडवाला या पॉश परिसरात उभी राहते. तेथेच हे दोघेही चहा विकत असल्याचे दिसून येते.
रात्री चहा न मिळाल्याने सुचली कल्पना :अमित कश्यप पंजाब तर मन्नू शर्मा हा हरियाणाचा आहे. हे दोघेही रात्री फिरायला गेल्यानंतर त्यांना चहाची तलब लागली. मात्र कुठेही चहा मिळाला नाही. याबाबत बोलताना हे दोघे म्हणाले की, 'आम्ही फक्त रात्री फिरायला गेलो होतो आणि एक कप चहा घ्यायची इच्छा झाली. मात्र आम्हाला चहा मिळण्याची अशी कोणतीही जागा दिसली नाही. चहा कुठे मिळेल ते आम्ही शोधून काढले. तेव्हाच मन्नूने चहा विकण्याचा विचार केला आणि अमितला त्याच्या ऑडी कारमधून चहा विकण्याची कल्पना सुचल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमच्या ऑडीमध्ये चहा विकून, मला वाटते आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकच चहा विकतात हा विचार आपण चुकीचा सिद्ध केला आहे. सायकलस्वारही चहा पितो आणि जग्वार चालवणारा माणूसही आमच्या चहाचा आस्वाद घेऊ शकत असल्याचेही या दोघांनी यावेळी सांगितले.
ऑडी टीची फ्रँचायझी करणार सुरू :आर्थिक स्थिती नसलेले लोकच चहा विकतात ही कल्पना मी ऑडी कारमध्ये चहा विकून चुकीची ठरवली असल्याचे या अमितने यावेळी स्पष्ट केले. सायकल चालवणारी व्यक्ती आणि जग्वार कारमध्ये प्रवास करणारी व्यक्ती देखील आमच्या चहाचा आनंद घेतात. अमित आणि मन्नू या दोन्ही मित्रांना भविष्यात मुंबईत 'ऑडी-टी'ची 'फ्रँचायझी' सुरू करायची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोघांनी महिनाभर केला सराव :दोन मित्रांनी घरीच ऑडीचा चहा विकण्याआधी महिनाभर विविध 'रेसिपी' बनवायला शिकले. पंजाबमधील मालेरकोटला येथील अमित कश्यप हा चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये व्यापार करायचा. तर मन्नू शर्मा हा हरियाणातील हिसारचा रहिवासी आहे. आता अमित आणि मन्नू 'ऑडी टी' फ्रँचायझी उघडण्याचा विचार करत आहेत. त्यांच्या ऑडी कारमधून ऑडी टी विकण्याची अनोखी कल्पना केवळ लोकांना आवडली नाही तर त्यांचा चहाच्या चवीनेही ग्राहकांना आकर्षित केले आहे. ग्राहकांनाही या चहाची चांगलीच पसंती मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मी इथे चहा घ्यायला येत आहे. कारण त्याची चव अप्रतिम आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी या भागातून जातो तेव्हा मला त्यांचा चहा घ्यावा वाटत असल्याचे एका ग्राहकाने सांगितले.