महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'दिशा’ कायद्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन; गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधापरिषदेत दिली.

anil deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Mar 14, 2020, 4:32 PM IST

मुंबई -राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली. दिशा कायद्याच्या धर्तीवरील नवीन कायदा करण्यात येणार असून त्यासाठी तयारी सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या समस्येमुळे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणे शक्य झाले नसल्याचे गृहमंत्री यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून सांगितले.

याबाबतचे निवेदन देताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी व महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन विधेयक आणण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. आंध्रप्रदेशने पारित केलेल्या दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी आम्ही या राज्याचा दौरा केला. गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास होऊन आरोपीला शिक्षा व्हावी, या उद्देशाने नवीन कायदा करीत आहोत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे नवीन विधेयक सादर करून नवीन कायदा पारित करण्याचे नियोजन होते. या प्रस्तावित विधेयकातील तरतुदीसंदर्भात विधी व न्याय, महिला व बालकल्याण, वित्त या विभागांचे अभिप्राय आवश्यक आहेत. मात्र, देशात आणि राज्यात आकस्मिकपणे उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या समस्येमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी करावा लागला लागला. त्यामुळे हा कायदा या अधिवेशनात मांडणे शक्य झाले नाही.

हे विधेयक दोन्ही सभागृहासमोर सादर करून त्यावर सदस्यांना मते मांडता यावी यासाठी कोरोनाची समस्या नियंत्रणात येताच विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची माहितीही गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details