महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाकरे सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन, उद्याच होणार बहुमत चाचणी

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवस होणार आहे. यामध्ये शनिवारी बहुमत चाचणी तर रविवारी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. यावेळी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.

Thackeray government
ठाकरे सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन

By

Published : Nov 29, 2019, 8:46 PM IST

मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडी सरकारसाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवस होणार आहे. यामध्ये शनिवारी बहुमत चाचणी तर रविवारी विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. यावेळी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जावून मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. मंत्रिमंडळाची आज दुसरी बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीसाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. हे अधिवेशन शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचे असणार आहे. या अधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे.

दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे. याबाबत उद्या अधिवेशनाचे कामकाज सुरु झाल्यावर घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय होणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक होणार आहे. त्यानंतर बहुमत चाचणीचा ठराव मांडला जाईल आणि त्यानंतर बहुमत चाचणी केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details