मुंबई -येथील पवई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज (गुरूवारी) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान ट्रक उलटल्याने वाहतूक मंदावली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड वरून अंधेरीकडे जाणारा ट्रक (MH 46 F 4971) उलटल्याने मोठया प्रमाणात रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
पवई आयआयटीसमोर ट्रक उलटला; मोठ्या प्रमाणात वाहतूक मंदावली
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून हा ट्रक वेगात अंधेरीकडे जात होता. यादम्यान, पवई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तो उलटला. यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना सकाळचे साडेदहा वाजले तरी ही प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते.
हेही वाचा -पायाला भिंगरी बांधून बाहेर पडलोय; जे गेले त्यांना घरीच बसविणार - शरद पवार
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून हा ट्रक वेगात अंधेरीकडे जात होता. यादम्यान, पवई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तो उलटला. यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना सकाळचे साडेदहा वाजले तरी ही प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. हा उलटलेला ट्रक वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला लावला आहे. यातच गांधीनगर ते आयटी मार्केट दरम्यान दोन बेस्ट बस व एक खासगी बस नादुरुस्त असल्याने वाहतुकीत आणखीन भर पडलेली आहे.