मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्युच्या आवाहन केले आहे. याच दिवशी मध्य रेल्वेने सर्व एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या आहेत. प्रामुख्याने 22 मार्च रोजी पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत निघणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या तसेच पॅसेंजर गाड्याही रद्द केल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. तसेच मेमो गाड्या ही 21 तारखेच्या मध्यरात्री पासून बंद करण्यात आल्या आहेत.
जनता कर्फ्यूच्या दिवशी मध्य रेल्वेच्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या रद्द
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्युच्या आवाहन केले आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस तसेच पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
संग्रहीत छायाचित्र
जनता कर्फ्यूच्या दिवशी प्रवासी घराबाहेर पडणार नाहीत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. मुंबईतील लोकल सेवा ही अंशतः बाधित असेल दररोजच्या तुलनेत केवळ 60 टक्के सेवा सुरू राहणार आहे. पुणे विभागामध्येही लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अमन लॉज ते माथेरान दरम्यानच्या शटल सेवा बंद राहणार असल्यचेही सुतार यांनी सांगितले.
हेही वाचा -कोरोना इफेक्ट: जनता कर्फ्युसाठी उद्या मुंबईत मेट्रो १ सेवा बंद