मुंबई :उद्या रविवारी (30, ऑक्टोबर ) रोजी होणाऱ्या छटपूजा ( Chhat Puja ) या धार्मिक सणानिमित्त वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी मुंबई पोलीसांनी नियोजन केले आहे. वाहतूक पोलिसांनी अंधेरीतील जूहू या परिसरात हे नियोजन करण्यात आले आहे. छटपूजा उत्सव जुहू येथील चौपाटीवर मोठ्या संख्येने महिलावर्ग साजरा करतात. त्या अनुषंगाने पश्चिम उपनगर येथील पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी लोकांची गरसोय टाळण्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे.
Chhat Puja 2022 : छठ पूजेसाठी अंधेरी परिसरातील जुहूत 'अशी' असेल वाहतूक व्यवस्था..
छटपूजा ( Chhat Puja ) या धार्मिक सणानिमित्त वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी मुंबई पोलीसांनी नियोजन केले आहे. वाहतूक पोलिसांनी अंधेरीतील जूहू या परिसरात हे नियोजन करण्यात आले आहे. छटपूजा उत्सव जुहू येथील चौपाटीवर मोठ्या संख्येने महिलावर्ग साजरा ( chhath pooja festival in juhu ) करतात. त्या अनुषंगाने पश्चिम उपनगर येथील पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी लोकांची गरसोय टाळण्यासाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे.
छटपुजेच्या निमित्त नियोजन -उद्या सकाळी दहा वाजल्यापासून ते 31 ऑक्टोबर सकाळी 11 वाजेपर्यंत छटपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या धार्मिक उत्सवाकरिता जुहू चौपाटी येथे अंदाजे चार ते पाच लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून जुहू चौपाटी येथे जाण्यासाठी व्ही. एम. रोड, जुहू रोड आणि जुहू तारा रोड, बिर्ला लेन येथे पादचाऱ्यांची आणि ऑटो रिक्षा तसेच इतर वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ राहणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक दिमागतीने मार्गक्रमण करत राहणार असल्याने नागरिकांनी विलंब टाळण्यासाठी, एस वी रोड किंवा पश्चिम द्रुतगती महामार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे.
या रोडवर वाहन उभे करण्यास मनाई - जुहू रोड (उत्तर व दक्षिण वाहिनी), जुहू तारा रोड (उत्तर व दक्षिण वाहिनी), बिर्ला लेन. व्ही. एम. रोड (उत्तर व दक्षिण वाहिनी) येथे गाड्या उभ्या करण्यास सक्त मनाई करण्यात आली, असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन पवार यांनी दिली आहे.