महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking : पुण्यात कोरोनाचा उद्रेक, आज ४१२नवीन बाधितांची नोंद

BIG Breaking
बिग ब्रेकिंग न्यूज

By

Published : Dec 31, 2021, 4:35 PM IST

Updated : Dec 31, 2021, 7:38 PM IST

19:37 December 31

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, आज ४१२नवीन बाधितांची नोंद

पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात आज 412 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक मोठी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

19:26 December 31

कोरोना संशयित कुणाला मानावे, केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिल्या मार्गदर्शक सूचना

खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास लागणे, अंगदुखी, चव किंवा वास कमी होणे, थकवा आणि जुलाब याशिवाय ताप आल्यास कोणत्याही व्यक्तीला कोविड-19 चे संशयित प्रकरण मानले जावे : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

18:47 December 31

म्हाडाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

म्हाडाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान होणार परीक्षा

ऑनलाइन होणार परीक्षा

18:02 December 31

धारावीत दोन दिवसात कोरोनाचे दुप्पट रुग्ण वाढले

मुंबई फ्लॅश

धारावीत दोन दिवसात कोरोनाचे दुप्पट रुग्ण वाढले

दोन दिवसांपूर्वी 17 रुग्णांची नोंद झाली होती

आज त्यात दुप्पट वाढ होऊन 34 रुग्णांची नोंद झाली आहे

17:58 December 31

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात कोब्रा 208 बटालियनचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. ही चकमक किस्टारामच्या पलाच्मा टेकड्यांमध्ये झाली. कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी याला दुजोरा दिला.

15:24 December 31

BIG Breaking - कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त प्रशासनाची चोख व्यवस्था

पुणे - शौर्य दिनानिमित्त (Bhima Koregaon Shaurya Din) सालाबादप्रमाणे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी व्यवस्था केली आहे. यामध्ये जवळपास 3 हजार पोलीस फौजफाटा तैनात (Police Security) करण्यात आला आहे. जयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील नागरिक, संघटना सामील होत असतात. त्यामुळे पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी म्हणून वाहतुकीचे मार्ग बदलले आहे.

Last Updated : Dec 31, 2021, 7:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details