महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे मार्गावर ११ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

लोअर परळच्या डिलाईल रोड पुलाच्या पाडकाम व बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान 11 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. आज रात्री 10 वाजल्यापासून ते उद्या रविवारी 3 फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही.

mum

By

Published : Feb 2, 2019, 10:42 AM IST

मुंबई - लोअर परळच्या डिलाईल रोड पुलाच्या पाडकाम व बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान 11 तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. आज रात्री 10 वाजल्यापासून ते उद्या रविवारी 3 फेब्रुवारीच्या सकाळी ९ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एकही लोकल धावणार नाही.


लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी २ फेब्रुवारीला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ४० टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येतील. यासाठी २ फेब्रुवारीला रात्री १० वाजल्यापासून ते ३ फेब्रुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही. अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवलीहून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. या मार्गावरील अनेक मेल, एक्स्प्रेसच्या वेळेत बदल केले जाणार आहे. लोअर परळ स्थानकाजवळील डिलाईल पूल गंजल्याचे स्पष्ट झाल्याने पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल बंद होता.


प्रवाशांसाठी जादा बसेस
मेगाब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी या मार्गावर बेस्टकडून विशेष ६ बसेस चालवण्यात येणार आहे. बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा ६ विशेष बसगाडया सोडण्यात येणार आहेत. या बसेस चर्चगेट ते दादर स्थानकादरम्यान धावतील. मरीन लाईन्स, चर्नीरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परेल आणि प्रभादेवी अशा सर्व स्थानकांवर रेल्वेला थांबा असेल. शनिवारी रात्री ९.३० ते रात्री १.३० वाजेपर्यंत या विशेष बस धावतील. त्यानंतर पहाटे ३.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत या बसेस धावतील.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details