महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात २ हजार ६९७ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ५६ रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात २,६९७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा २०,०६,३५४ वर पोहचला आहे. राज्यात आज ५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

corona
कोरोना

By

Published : Jan 23, 2021, 8:26 PM IST

मुंबई -आज राज्यात २,६९७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा २०,०६,३५४ वर पोहचला आहे. राज्यात आज ५६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५०,७४० रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ४३,८७० अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२२ टक्के -

राज्यात आज ३,६९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १९,१०,५२१ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४१,४५,८२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०६,३५४ नमुने म्हणजेच १४.१८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,१३,६७८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ४३,८७० अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

राज्यात १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, १८ जानेवारीला १,९२४ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

हेही वाचा -'नेताजींचे काम, आयुष्य अन् निर्णय हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी'

हेही वाचा -आनंद महिंद्रांची टीम इंडियाच्या नव्या शिलेदारांना 'महागडी' भेट

ABOUT THE AUTHOR

...view details