मुंबई - सीएसएमटी स्थानकाबाहेर झालेल्या पूल दुर्घटनेत डोंबिवलीच्या ३ महिलांचा मृत्यू झाला आहे. या तिघी मुंबईच्या जीटी रुग्णालयात परिचारीका म्हणून काम करत होत्या.
हिमालया पूल अपघातात डोंबिवलीच्या तिघींचा बळी; घटनेने परिसरात शोककळा
अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी या तिघींची नावे आहेत. डोंबिवली पश्चिमेला राहणाऱ्या या तिघी आज संध्याकाळी नाईट ड्युटीला जाण्यासाठी घरून निघाल्या, त्या कधीही परत न येण्यासाठीच.
स्थानिक रहिवासी व नातेवाईक
अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी या तिघींची नावे आहेत. डोंबिवली पश्चिमेला राहणाऱ्या या तिघी आज संध्याकाळी नाईट ड्युटीला जाण्यासाठी घरून निघाल्या, त्या कधीही परत न येण्यासाठीच. सीएसएमटी स्थानकाबाहेर पूल कोसळला आणि त्यात या तिघींचाही मृत्यू झाला. या घटनेने तिघी राहत असलेल्या परिसरावर शोककळा पसरली आहे.