महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dispute On Name : मुंबई महापालिकेत टिपू सुलतानच्या नावाचा वाद पुन्हा गाजणार

मालाड येथील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव (The name of Tipu Sultan) देण्यावरून मुंबईमधील राजकारण (Politics in Mumbai) तापले होते. हा वाद शांत असतानाच पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी या उद्यानाला झाशीची राणीचे नाव (name of the queen of Jhansi) देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्याला समाजवादी पक्षाने विरोध केला आहे. हे नाव बदलू नये. भाजपा प्रमाणे राजकारण (Politics like BJP) करू नये असे आवाहन समाजवादी पक्षाने केले आहे.

Tipu Sultan name
टिपू सुलतान नावाचा वाद

By

Published : Feb 23, 2022, 6:32 PM IST

मुंबई:मालाड येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या मालकीच्या भूखंडावर उद्यान आहे त्याचे सुशोभीकरण पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले. या उद्यानाला कित्तेक वर्षे टिपू सुलतान या नावाने ओळखले जात असल्याने उद्यानाच्या पाटीवर टिपू सुलतान उद्यान असे नाव लिहिण्यात आले. यावरून भाजपाने आंदोलने करत विरोध केला. यावेळी महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए तसेच इतर कोणत्याही प्राधिकरणाने या उद्यानाला टिपू सुलतान उद्यान नाव दिल्याचे समोर आलेले नाही.

शिवसेना नगरसेवकांची मागणीटिपू सुलतान या नावावरुन वाद होत असतानाच महापौर किशोरी पेडणेकर यांनी झाशीच्या राणीचे नाव उद्यानाला द्यावे अशी मागणी शिवसेनेची असल्याचे म्हटले होते. त्यानंतर उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार, कांदिवलीमधील शिवसेना नगरसेवक एकनाथ हुंडारे, शिवसेना विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, शिवसेना नगरसेविका गीता भंडारी, शिवसेना नगरसेविका विनया सावंत व उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनीही महापौर तसेच बाजार व उद्यान समिती अध्यक्षांना नामकरणाबाबत पत्र दिली आहेत. याबाबतचा अहवाल पालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीने मंजूर केला असून पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यास या उद्यानाला झाशीची राणी मैदान असे नाव दिले जाऊ शकते अशी माहिती माहिती बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांनी दिली.समाजवादी पक्षाचा नाव बदलण्यास विरोध मालाड येथील उद्यान गेले कित्तेक वर्षे टिपू सुलतान यांच्या नावाने ओळखले जाते. इंग्रजांविरोधात लढलेले म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपा मात्र त्यांच्या नावावरून राजकारण करत आहे. भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपले हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका महापुरुषाचे नाव काढण्यासाठी दुसऱ्या महापुरुषाचे नाव वापरले जात आहे. हे योग्य नाही. शिवसेनेने असे करणे योग्य नाही. झाशीची राणी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या नगरसेविकेने दिला आहे. हा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती महापौरांना पत्र देऊन केली आहे. झाशीची राणी यांचे नाव मोठ्या वास्तूला द्यावे अशीही सूचना केल्याची माहिती समाजवादी पक्षाचे आमदार व मुंबई महापालिकेतील गटनेते रईस शेख यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details