मुंबई -कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. कोरोनावर विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आपल्या जीवावर उदार होऊन नागरिकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह सफाई कर्मचारीही मोलाचा वाटा उचलत आहेत. मात्र त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमूळे कामगारांची कुचंबणा होत आहे. विक्रोळी येथील असलेल्या सफाई कामगारांच्या हरियाली आणि टागोर नगर चौकीत कोणतीही सुखसुविधा नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहे.
या ठिकाणी एकूण 110 कर्मचारी कार्यरत आहेत. याठिकाणी बसायला जागा नाही. जेवायला जागा तसेच हात धुवायला पाणी नाही, अशी भयंकर परिस्थिती सफाई कामगारांवर आली आहे. महिलांनाही कपडे बदलण्यासाथी जागा नाही. ते ज्या कपड्यावर कामावरती येतात त्याच कपड्यावर परत जावे लागत असल्याने कोरोनाचा धोका अधिक वाढतो. एकीकडे सरकार सांगत आहे की घरी बसा बाहेर निघू नका मात्र आपलं कर्तव्य बजावणारा सफाई कामगारांना मात्र कोणत्याही सुख-सुविधा देत नसल्याचे चित्र दिसत आहे.विक्रोळी येथे महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी दोन चौक्या आहेत. मात्र या चौक्या फक्त नावापुरत्याच आहेत. येथे सफाई कामगारांसाठी कोणत्याही सुख सुविधा नाही आहेत. आठ बाय दहा अशा दोन रूम आहेत. यामध्ये 110 सफाई कामगार कार्यरत आहेत. कामगार आराम आणि जेवायला जागा नाही. जिथे जागा मिळेल तिथे कामगार जेवायला बसतात. आज करून काळामध्ये सफाई कामगार आपली जबाबदारी योग्यप्रकारे बजावत आहेत मात्र त्यांना मिळणाऱ्या सुविधा तुटपुंज्या आहेत. महिलांना कपडे बदलण्यासाठी वेगळी रूम नाही. त्यांना प्रवास करताना लोक हटकतात असाही अनुभव काही महिलांना आला आहे. आमची मागणी हीच आहे की हे देखील मानव आहेत आणि यांना योग्य वागणूक मिळाली पाहिजे. कोरोना काळात ते त्यांचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत मात्र त्यांचाही विचार होणे आवश्यक आहे. कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर मिळणारे 50 लाख ही अनेक कामगारांना अजून मिळालेले नाही. यांची ही योजना केंद्र सरकार निबंध केली आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनालाआमची हीच मागणी आहे या लोकांना योग्य सुख-सुविधा मिळावे असे कचरा वाहतूक श्रमिक संघाचे जनरल सेक्रेटरी मिलींद रानडे यांनी सांगितले.