महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Desai Suicide Case : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी एडलवाईज कंपनीच्या तीन जणांची दहा तास चौकशी

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी (Nitin Desai suicide case) एडलवाईस कंपनीच्या तिघांची दहा तास चौकशी (interrogation of three people from Edelweiss) करण्यात आली आहे. याआधीही या कंपनीच्या अधिकाऱ्यांची रायगड पोलिसांनी चौकशी केली होती.

Nitin Desai Suicide Case
Nitin Desai Suicide Case

By

Published : Aug 11, 2023, 10:47 PM IST

मुंबई : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी (Nitin Desai suicide case) एडलवाईस कंपनीचे तीन अधिकारी आज सकाळी 10.00 च्या सुमारास खालापूर पोलिस ठाण्यात हजर झाले. प्रतिनिधी कागदपत्रांच्या लाल फितीसह पोलिस ठाण्यात आले होते. या अधिकाऱ्यांना 14 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता पुन्हा खालापूर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.


तीन जणांची दहा तास चौकशी : आज एडलवाईस कंपनीच्या तीन प्रतिनिधींनी आणलेली सर्व कागदपत्रे घेतली. अजूनही कागदपत्रांची मागणी केली जात आहे. पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे बँकिंग विभागाच्या तज्ज्ञांकडे सोपवली जाणार असून या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी बँकिंग तज्ज्ञ, चार्ट अकाउंट्स आणि वकील यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आज पोलिसांनी तिघांची 10 तास चौकशी केली. तपासासाठी आलेल्या एडलवाईस कंपनीच्या अधिकाऱ्यांची नावे विचारली असता, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नावे सांगण्यास नकार दिला.

पोलिसांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता :नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलिसांनी एडलवाईस फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून 8 ऑगस्ट रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 8 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एडलवाईस कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांसह व्यवस्थापकीय संचालक पोलिस चौकशीसाठी हजर झाले. पोलिसांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

पहिल्यांदाच 8 तास कसून चौकशी : एडलवाईस कंपनीच्या चार अधिकाऱ्यांची खालापूर पोलिसांनी 8 तास कसून चौकशी केली. पोलिसांच्या सूचनेनुसार कंपनीचे अधिकारी आवश्यक कागदपत्रे घेऊन आले होते. काही कागदपत्रांची माहिती अपूर्ण होती. त्यामुळे एडलवाईस कंपनीच्या अधिकाऱ्यांना 11 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले. 8 ऑगस्ट रोजी एडलवाईस कंपनीचे एकूण 4 प्रतिनिधी उपस्थित होते. एडलवाईस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक फणींद्रनाथ काकरला यांची कसून चौकशी करण्यात आली, तर अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे यांनी अन्य तिघांची नावे सांगण्यास नकार दिला. 'ईटीव्ही भारत'ने झेंडे यांना अन्य तीन पदाधिकाऱ्यांची नावे विचारली असता, योग्य वेळी त्यांची नावे सांगू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Nitin Desai Suicide Case: देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी एडलवाईजच्या संचालकांना तातडीचा दिलासा नाही, पुढील सुनावणी १८ ऑगस्टला होणार
  2. Nitin Desai death case : नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणीचा गुन्हा रद्द करा- एडलवाईज कंपनीची उच्च न्यायालयात धाव
  3. Nitin Desai : 'माझे वडील फ्रॉड नव्हते, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करा'; नितीन देसाईंच्या मुलीची सरकारकडे मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details