मुंबई - महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात 27 जुलै रोजी मीनाबाई सचिन पावरा यांनी मुलाला जन्म दिला. मुलाचे वजन कमी होते. या आदिवासीबहुल जिल्ह्यातील घटना असल्याने यात कुणाला काही नवल वाटले नाही. कारण, आदिवासी बहुल भागात अशा घटना ( Low weight of childern in tribal areas ) नेहमीच होत असतात. पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच, त्या बाळाचे वजन 2.18 किलो वरून 3 किलो पर्यंत वाढले, जे पूर्वीच्या प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाढले होते. आणि, हे सर्व शक्य झालंय IIT मुंबईतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या सुधारित स्तनपान तंत्राच्या ( breastfeeding technique ) संचामुळे. IIT मुंबईने विकसित केलेल्या या तंत्रज्ञामुळे मीनाबाईंच्या मुलाप्रमाणेच आदिवासी भागातील शेकडो नवजात बालकांना याचा फायदा होणार आहे.
क्रॉस-क्रेडल होल्डवर आधारित तंत्रज्ञान - IIT मुंबईच्या सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ( Technology Developed by IIT Mumbai ) अल्टरनेटिव्हज फॉर रुरल एरियाज (CTARA) च्या सहयोगी प्राध्यापक रुपल दलाल यांनी हे नवीन स्तनपान तंत्र विकसित केले आहे. दलाल यांनी सांगितल्याप्रमाणे, कमी वजनाच्या बाळांसाठी WHO मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या क्रॉस-क्रेडल होल्ड वर तंत्र सुधारित केले आहे. आईची बोटे बाळाच्या ओठांना समांतर राहावीत म्हणून स्तनाच्या U-आकाराच्या कंटूरिंगसह, हे बाळाच्या तोंडाला एरोलाच्या खालच्या भागाशी योग्य जोडण्यास मदत करते. या स्थितीत, बाळाला आईच्या स्तनांजवळ आणले जाते आणि आईच्या हाताने बाळाची मान देखील नियंत्रित ठेवली जाते. जेणेकरून मान मागे वाढू शकेल. यामुळे बाळाला दूध पिणे सोपे होते.