मुंबई- हार्बर मार्गावर कुर्ला चुनाभट्टी दरम्यान आज (सोमवार) दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सीएसएमटीकडे येणारी लोकलसेवा प्रभावित झाली होती. या मार्गावरील लोकल २० मिनिटे उशिराने धावत आहेत.
कुर्ला चुनाभट्टी दरम्यान तांत्रिक बिघाड; लोकल सेवा पूर्ववत
लोकल सेवा १० मिनीटे उशीरा सूरू असल्याच्या उद्घोषणाही काही स्थानकांमध्ये करण्यात आल्या. दुपारी १२.२० ते १ वाजेपर्यंत बिघाड होता. त्यानंतर तत्काळ बिघाड दुरुस्त करण्यात आला असून लोकलसेवा पूर्ववत सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी सांगितले.
परिसरात जेसीबीने काम सुरू असताना सिग्नल यंत्रणेची वायर कुर्ला चुनाभट्टी दरम्यान तुटली. यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडली. परिणामी हार्बर मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली. प्रवाशांना ऐन दुपारी उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे भर उन्हात त्यांना हार्बरच्या या यांत्रिक बिघाडाचाही मनस्ताप सहन करावा लागला.